श्रीवेद मित्र मंडळ तर्फे सामूहिक उपनयन संस्कार

औरंगाबाद ,२२ मार्च /प्रतिनिधी :-औरंगाबाद शहरातील ब्रह्मवृंद युवकाने एकत्र येऊन आठ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या श्रीवेद प्रतिष्ठान मित्रमंडळातर्फे  11एप्रिल आणि 11  मे  2122 रोजी सामूहिक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

किरडपुरा श्रीराम मंदिरात  या सोहळा होणार आहे.करोना महामारी   परिस्थितीत मोठ्या सोहळ्यास फाटा देऊन आर्थिक संकटावर मात करण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून श्री वेद प्रतिष्ठान तर्फे उपनयन संस्काराचे आयोजन करते. समाजातील ब्राह्मण  कुटुंबातील मुलांवर बालपणीच धार्मिक संस्कार व्हावेत यासाठी या उपनयन चे आयोजन करण्यात येते आहे.या सोहळ्यात मातृ भोजन, बटू सहीत 11   लोकांची जेवणाची व नाष्टाची व्यवस्था करण्यात आली आहे.बटूस पळी, पेला, ताम्हण ,सोवळे व पुजा साहीत्य व चौल याची व्यवस्था  करावी लागणार आहे. 

या उपनयन संस्कार सोहळ्यात सह्भागी   घेण्यासाठी अनिकेत मयुरे,  स्वप्निल पैठणकर ,गजानन माहोरकर  वैभव चौधरी , आनंद कुलकर्णी , दीपक जोशीविनायक जोशी  अनिकेत जोशी  यांना संपर्क करावा  असे आवाहन वेद ग्रुप चे प्रमुख  जीवन जोशी व वेद ग्रुप चे अध्यक्ष  श्रीकांत सोनटकके यांनी केले आहे.

बटूचा नोंदणी साठी संपर्क:-1) स्वप्नील पैठणकर :-79724998442)

अनिकेत मयुरे :- 8275520770

3) स्वप्नील वानेगावकर :-8830482608

यात मोठ्या संख्येने बटूंची नोंदणी करावी असे आवाहन वेद ग्रुप तर्फे करण्यात आले आहे.