शिऊर बंगला येथील व्यंकटेश कृषिसेवा केंद्रास आग ,लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक
वैजापूर ,२५ सप्टेंबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथील व्यंकटेश कृषिसेवा केंद्र या दुकानास गुरुवारी (ता.23) रात्री बारा वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली.या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.सुदैवाने या आगीत कसलीही जीवित हानी झाली नाही.
अग्निशमन दलाने तब्बल सात तास अथक परिश्रम घेऊन ही आग आटोक्यात आणली.रात्री बारा वाजता लागलेली ही आग आज सकाळी सातच्या सुमारास आटोक्यात आली.
अग्निशामक दलाचे अधिकारी एल.पी.कोल्हे, सचिन शिंदे, विक्रम भुइंगड, किरण पागोरे,शुभम आहेरकर,पंकज भालेकर व भुरालाल सलामपूरे यांनी ही आग आटोक्यात आणली.