वैजापूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सदस्य व कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

वैजापूर ,२५ सप्टेंबर /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील शिवराई,दहेगाव, हडसपिंपळगाव व लासुरगाव येथील विविध पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

लासुर सर्कलमधील माजी सरपंच व ग्रामपंचायत  सदस्य  संजुबाबा आहेर (शिवराई ग्रामपंचायत सदस्य) इस्राईल पठाण ( शिवराई ग्रामपंचायत सदस्य) भाऊसाहेब शेलार (माजी सरपंच दहेगाव) समाधान त्रिभुवन  (दहेगाव) बाळू सोनवणे (हडसपिंपळगाव)  संदीप निघोटे,ज्ञानेश्वर निघोटे, दिपक हरिश्चंद्रे( लासुरगाव)आदींनी आज अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. सुभेदारी विश्रामगृह येथे हा काँग्रेस प्रवेशाचा कार्यक्रम झाला. औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.कल्याणराव काळे,प्रदेश काँग्रेसचे सदस्य सुभाष झाबंड, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पाटील ठोंबरे  मनसुखभाऊ झाबंड, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे आदी यावेळी उपस्थित होते.