इयत्ता दहावी परीक्षेच्या मूल्यमापन कार्यपध्दती संदर्भात हेल्पलाईन उपलब्ध

औरंगाबाद,२१जून /प्रतिनिधी :- सन-2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्त 10 वी) परीक्षा कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आलेली आहे. तसेच शासनाच्या दि.28 मे 2021 च्या शासन निर्णयानुसार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्ष (इ.10 वी) साठी मूल्यमापन कार्यपध्दती संदर्भात हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्या अनुषंगाने शासन निर्णयातील तरतुदीनुसार मंडळामार्फत मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्याचा तपशील, सूचना व वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले असून त्याची कार्यपध्दती निश्चित केली आहे. त्यामध्ये सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेासाठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या नियमित, पुर्नपरीक्षार्थी, नाव नोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी, तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे परिक्षार्थी तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत प्रविष्ठ विद्यार्थी यांचे मूल्यमापनाबाबतचा तपशील व विषयनिहाय परिशिष्टे याबाबत परिपत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच शासन निर्णय व परिपत्रकानुसार इ.10 वीच्या मूल्यमापन कार्यपध्दती संदर्भात प्रशिक्षणाचा व्हिडीओ मंडळाच्या यु-ट्युब चॅनेलवर http://mh-ssc.ac.in/faq या लिंकवर  दि.10 जून 2021 रोजी स.11.00 पासून उपलब्ध करुन दिलेला आहे.

मूल्यमापन कार्यपध्दतीमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय मंडळनिहाय स्वतंत्र हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार विभागीय मंडळ निहाय संबंधित कार्यालयाचे सहसचिव /सहा सचिव/अन्य अधिकारी संबधित हेल्पलाईनद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.

अ.क्र.विभागीय मंडळाचे नावविभागीय सहसचिव/सह सचिव यांचे नावभ्रमणध्वनी क्रमांकई-मेल आयडी
1)पुणेश्रीमती प्रिया शिंदे, सहसचिवश्रीमती संगिता शिंदे, सहा. सचिव9689192899
8888339530
[email protected]
2)नागपूरश्रीमती माधुरी सावरकर, सचिव (प्र) तथा सहसचिवश्री.व्ही.एच.जोग, सहा.सचिव9403614142
9890514839
[email protected]
3)मुंबईश्री.मुश्ताक शेख, सहसचिवश्री.गिरीधर भोज, सहा.सचिव (प्र)श्रीमती एस.एस.फाटक वरिष्ठ अधिक्षक7020014714
7058595664
9082657395
9869433816
[email protected]
4)औरंगाबादश्री.राजेंद्र पाटील, सहसचिव
श्री.आर.आर.गगे, वरिष्ठ अधीक्षक
9922900825
9421336801
9423469712
[email protected]
5)अमरावतीश्रीमती जयश्री राऊत, सहा सचिव9960909347[email protected]
6)कोल्हापूरश्री.देविदास कुलाळ, सचिव (प्र) तथा सहसचिवश्रीमती सुवर्णा सावंत, सहा.सचिव7588636301
8007597071
[email protected]
7)नाशिकश्रीमती एम.यु.देवकर, सहा.सचिव (प्र)श्री.आंधळे डी.के., वरिष्ठ अधीक्षक 8888339423
7755903427
8329004899
9881472899
[email protected]
8)लातूरश्री.संजय पंचगल्ले, सहा.सचिवश्री.चवरे ए.पी.वरिष्ठ अधीक्षक9421694282
8830715252 
[email protected]
9)कोकणश्रीमती भावना राजनोर, सहसचिवश्री.दिपक पोवार, वरिष्ठ अधीक्षक8806512288
8830384044
[email protected]