ऑरिक सिटीमुळे औरंगाबाद देशातील सर्वोत्कृष्ट औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाईल- निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत

औरंगाबाद :- दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत ऑरिक सिटी क्षेत्रात उद्योगांसाठी सुनियोजित पायाभूत सुविधा असल्यामुळे आगामी काळात औरंगाबाद शहराचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होणार आहे व हे शहर औद्योगिकदृष्ट्या देशातील सर्वोत्कृष्ट विकसित शहर म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी व्यक्त्‍ केला.

Image

शेंद्रा येथील ऑरिक सिटीच्या सभागृहात आज दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर अंतर्गत येणाऱ्या ऑरिक सिटी (शेंद्रा-बिडकीन) आणि दिघी पोर्ट औदयोगिक क्षेत्र विकासाचा  श्री.कांत यांनी सविस्तर आढावा घेतला. या बैठकीला डिएमआयसीचे उपाध्यक्ष अभिषेक चौधरी,  एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनंबलगन, ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथू श्रीरंगानायक, सहसंचालक जितेंद्र काकुस्ते, आदी उपस्थित होते.

Displaying WhatsApp Image 2021-06-12 at 4.48.57 PM.jpeg

श्री. कांत म्हणाले की, ऑरिक सिटीमध्ये उदयोगांसाठी सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे आगामी काळात या ठिकाणी मोठया प्रमाणात उदयोगांची भर पडणार आहे. त्यामुळे औरंगाबाद व परिसरातील औद्योगिक क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होईल.  याशिवाय नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गामुळे विकासाला अधिक चालना मिळेल. औरंगाबादच्या विमानतळाचे विस्तारीकरण झाल्यास या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानांची  वाहतूक सुरु होईल. जेणेकरुन उदयोगांच्या विकासाबरोबर येथील पर्यटनालाही चालना मिळेल. तसेच औरंगाबाद शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे औद्योगिक वसाहत केंद्र होण्यास नक्कीच मदत होणार आहे. या विकासात्मक बदलासाठी निती आयोग निश्चितच सहकार्य करेल, असे त्यांनी  सांगितले.

Displaying WhatsApp Image 2021-06-12 at 4.49.29 PM.jpeg

शेंद्रा औद्योगिक क्षेत्राच्या विकासामध्ये  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे भरीव योगदान असल्याचे सांगून ते पुढे म्हणाल की,  शेंद्रा परिसरातील ऑरिक सिटीची इमारत ही एक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच मुलभूत सुविधांच्या विकासाचा जागतिक दर्जाचा उत्तम नमुना आहे या इमारतीकरता अत्याधुनिक सुविधांचा वापर करण्यात आला आहे. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. ऑरिक सिटी उद्योगाप्रमाणेच वसाहती, अतिथी सेवा, पर्यटन, व्यापार या क्षेत्रातील विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे एकात्मिक सर्वागिंण विकासाचे केंद्र म्हणून आगामी काळात गणले जाईल. यासाठी रस्ते वाहतूक, हवाई वाहतूकीच्या सुविधात वाढ करण्यासाठी निती आयोग प्रयत्न करीत आहे. देशाप्रमाणेच जगातील उद्योगक्षेत्रातील व्यावसायिक आणि उद्योजकांना गुंतवणूकीसाठी आकर्षित करणाऱ्या सुविधा ऑरिकच्या माध्यमातून दिल्याने औरंगाबाद सह महाराष्ट्राचा प्रादेशिक विकास होण्यास मदत होणार आहे, शेंद्राप्रमाणे दिघी येथील औद्योगिक क्षेत्राचाही विकास करण्यात येणार आहे.  असेही त्यांनी सांगितले.

Displaying WhatsApp Image 2021-06-12 at 4.49.30 PM.jpeg

दरम्यान,  बैठकीपूर्वी श्री. कांत यांनी शेंद्रा औदयोगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांची पाहणी केली. त्यानंतर ऑरिक सिटीच्या इमारतीची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना ऑरिक सिटीच्या आराखडाविषयी सविस्तर माहिती दिली. इमारतीतील  नियंत्रण कक्षाची पाहणी  करुन त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

Image

इंटरनॅशनल कन्व्हेन्शनसह वर्ल्ड क्लास सिटी बनविणार – अमिताभ कांत

इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर,आणि उद्योग वाढ आणि पायाभूत सुविधाच्या संदर्भात औरंगाबाद जिल्हा देशात अग्रेसर बनविणार असे, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी खासदार डॉक्टर भागवत कराड यासह औरंगाबाद येथील उद्योजक यांच्या बैठकित सांगितले. यापुढील काळात शहर विकासाच्या बाबतीती मी पूर्ण पणे मदत करेल, असे अमिताभ कांत यांनी यांनी आश्वासन दिले.

     देशामध्ये औरंगाबाद शहर मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे उद्योग आणि पर्यटन या शहराच्या जमेच्या बाजू असल्याने डी. एम. आय. सी.  चा  एकत्रित मास्टर प्लॅन तयार करण्याच्या सूचना  दिल्यात.  इटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर लवकरात लवकर सुरू करू, यासाठी संपूर्णपणे सहकार्य करू असे आश्वासन दिले आहे. त्यासाठी लागणारी जमीन  राज्य सरकारने द्यावींत अन  केंद्र सरकार खर्च करण्यात येईल.  असे, त्यांनी सांगितले.

बैठकीसाठी उद्योग संघटनाचे पदाधिकारी सी.आय.आय चे. मुकुंद कुलकर्णी ,विवेक देशपांडे, राम भोगले ,ऋषी बागला, मासिआचे नारायण पवार ,यासह डीएमआयसीचे अधिकारी अभिषेक यांची उपस्थिती होती.
औरंगाबाद आणि मराठवाड्याचा विकासाचा केंद्रबिंदू असलेले डीएमआयसी आणि ऑरिक सिटी याबाबत आढावा घेण्यासाठी निती आयोगाचे अमिताभ कांत हे औरंगाबाद दौऱ्यावर आहे. त्यांनी जिल्ह्यातील पर्यटन, उद्योग वाढ, विमानतळ विस्तारीकरण आणि पायाभूत सुविधा यासंदर्भात सविस्तरपणे खा.डॉ.भागवत कराड आणि औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी यांच्याबरोबर चर्चा केली.

औरंगाबाद जिल्ह्यात जागतिक दर्जाचे दोन हेरीटेज अजिंठा आणि वेरूळ आहे. त्यामुळे येथे जास्तीत जास्त पायाभूत सुविधा कशा देता येईल आणि पर्यटन विकास त्यातून अर्थव्यवस्था आणि रोजगार वाढ याबाबतीत विकासकामे होणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठे पर्यटन वाढीसाठी आगामी काळात मी स्वत प्रयत्न करेल.

वाळूज ,चिकलठाणा ,शेंद्रा ,रेल्वेस्टेशन या चार औद्योगिक वसाहती शहराभोवती असून, देशात उद्योगाचे मोठे केंद्र आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराचे सर्वाधिक मोठे पोटेन्शिअल उद्योग आहे,किमान सात हजार कोटी रुपये पेक्षा जास्त गुंतवणूक शहरात आहे. त्यामुळे यापुढे देखील उद्योग शहरात येण्यासाठी मी कटिबद्ध असून ,पायभूत सुविधा देण्यासाठी केंद्रीय सरकार मदत करेल. औरंगाबाद शहरराचा मास्टर प्लँन तयार करवा अन त्यास मी दिल्लीत मान्यता देतो, इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर चांगल्या पद्धतीने उभे राहू शकते, त्यासाठी राज्य सरकार कडून तत्काळ जमीन उपलब्ध करून द्या.त्यास मी दिल्लीत मान्यता कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याची जबाबदारी मी स्वतः घेतो.असे यावेळी आश्वासन कांत यांनी दिले. औरंगाबाद मधील चिकलठाणा विमानतळाचे विस्तारीकरण करून, आंतरराष्ट्रीय विमानसेवा या शहराशी जोडण्यात येईल, त्यासाठी त्याबाबत मी दिल्लीमध्ये विमानतळ प्राधिकरणाचे चेअरमन ,संचालक यांना कळवून तात्काळ ही सुविधा औरंगाबाद सुरू कशी करण्यात येईल.