औरंगाबाद जिल्ह्यात 1154 कोरोनामुक्त, तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

औरंगाबाद, दि. 05 :  औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1154 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 597 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 77 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 1846 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

          आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.  भारतमाता नगर (1), इंदिरानगर न्यू बायजीपुरा (1), न्यू कॉलनी, रोशन गेट (1), भावसिंगपुरा (1), त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी (1), बेगमपुरा (1), चिश्तिया कॉलनी (1), फाझलपुरा (1), रेहमानिया कॉलनी (3), गांधी नगर (1), युनूस कॉलनी (2), जुना मोंढा, भवानी नगर (1), शुभश्री कॉलनी, एन सहा (1), संत ज्ञानेश्वर नगर, एन 9 (1), आयोध्या नगर, एन 7 (7), बुडीलेन (3), मयूर नगर, एन अकरा (1), विजय नगर, गारखेडा (3), सईदा कॉलनी (1), गणेश कॉलनी (1), एसटी कॉलनी, फाजलपुरा (1), रोशन गेट परिसर (1), भवानी नगर, जुना मोंढा (1), औरंगपुरा (2), एन-आठ सिडको (1), समता नगर (5), ‍मिल कॉर्नर (3), जवाहर कॉलनी (3), मोगलपुरा (2), म्हाडा कॉलनी (1), जुना मोंढा (1), नॅशनल कॉलनी (1), राम मंदिर, बारी कॉलनी (1), विद्यानिकेतन कॉलनी (1), देवडी बाजार (1), एन सात सिडको (1), एन बारा (1), आझाद चौक (1), टी.व्ही. सेंटर एन अकरा (1), कैलास नगर (1), भोईवाडा (1),  चिकलठाणा (1), किल्लेअर्क (1), एन तीन  सिडको (6), इंदिरा नगर (1), रोजाबाग (1), अन्य (3) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 30 महिला आणि 47 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत 1154 जण कोरोनामुक्त

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) पाच, जिल्हा सामान्य रुग्णालयातून (मिनी घाटी)  10 रूग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत. मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आतापर्यंत एकूण 1154 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.

घाटीत तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

          शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) औरंगाबाद शहरातील नेहरू नगर, कटकट गेट (सदफ कॉलनी) येथे राहणाऱ्या 30 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा चार जून रोजी दुपारी दोन वाजता मृत्यू झाला. या 30 वर्षीय  गरोदर महिलेस 28 मे रोजी घाटीमध्ये दुपारी चार वाजता भरती करण्यात आले होते, त्याच दिवशी त्यांची प्रसूती झाली व त्यांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले. त्यांचा अहवाल 29 मे रोजी पॉझिटिव्ह आला. त्यांच्या किडनीचे कार्य अतिशय कमी असल्याने त्यांना डायलिसिस देण्यात आले. परंतु त्यांच्या शरिरातील प्राण वायूचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार चालू असताना 4 जून रोजी दुपारी दोन वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच पाच जून रोजी पहाटे दोन वाजता रहेमानिया कॉलनीतील 34 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णाचा, दुपारी 1.20 वाजता तक्षशीला नगरातील 48 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

          त्यामुळे आतापर्यंत घाटीत 74, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 20, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 95 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *