औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भातील याचिकेची सुनावणी लांबणीवर 

औरंगाबाद, दि. ९ – औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेले प्रकरण आज (दि. ९) प्रबंधक यांच्यासमोर ठेवण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या दिनांक ४ मार्च २०२१  रोजीच्या अहवालाप्रमाणे अद्याप सदर प्रकरणात राज्य शासन, राज्य निवडणूक आयोग तसेच मनपा यांच्या वतीने शपथपत्र सादर करण्यात आलेले नाही. केवळ राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचे काम करण्याची मुभा द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज यापूर्वी सादर केलेला आहे. प्रबंधक आता सदर प्रकरणात पुढील तारीख द्यायची किंवा याचिका न्यायपीठासमोर सुनावणीसाठी वर्ग करावयाची याबाबत निर्णय घेतील. सदर निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यावर प्रकरणाची  वस्तुस्थिती स्पष्ट होईल.