फेब्रुवारी महिन्यात 1,13,143 कोटी रुपये जीएसटी महसूल संकलित

नवी दिल्ली, १ मार्च  2021:

फेब्रुवारी 2021 च्या महिन्यात एकूण 1,13,143 कोटी रुपये जीएसटी महसूल संकलित करण्यात आला आहे, त्यापैकी सीजीएसटी 21,092 कोटी रुपये आहे, एसजीएसटी 27,273 कोटी रुपये, आयजीएसटी 55,253 कोटी रुपये आहे (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या,24,382  कोटी रुपयांसह) आणि अधिभार 9,525 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर संकलित 660 कोटी रुपयांसह) आहे.

सरकारने नियमित तडजोड  म्हणून आयजीएसटीमधून  22,398  कोटी रुपये सीजीएसटीला आणि  17,534  कोटी रुपये एसजीएसटीला दिले आहेत. या व्यतिरिक्त, केंद्र व राज्ये/केंद्रशासित प्रदेश यांच्यातील 50:50 गुणोत्तरानुसार आयजीएसटीतील तात्पुरती तडजोड  म्हणून केंद्र सरकारने 48,000 कोटी रुपये दिले आहेत. फेब्रुवारी   2021 महिन्यात नियमित निपटाऱ्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी मिळविलेला एकूण महसूल सीजीएसटीसाठी, 67,490 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 68,807 कोटी रुपये आहे.

जीएसटी महसुलात सुधारणेच्या अलिकडच्या काळाच्या अनुषंगाने फेब्रुवारी 2021 महिन्यातील महसूल मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसूलपेक्षा 7 टक्के  जास्त आहे. या महिन्यात वस्तूंच्या आयातीमधून मिळणारा महसूल गेल्या वर्षीपेक्षा 15% जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल 5% जास्त होता.

जीएसटी महसुलाने सलग पाचव्या महिन्यात 1 लाख कोटींचा तर सलग तिसऱ्यांदा 1.1 लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. अर्थव्यवस्थेत पुन्हा उभारीचे हे लक्षण असून कर प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांचा हा परिणाम आहे.