गेल्या 24 तासात कोविड-19 चे 5,355 रुग्ण बरे

नवी दिल्ली, 5 जून 2020

गेल्या 24 तासात कोविड-19 चे 5,355 रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत कोविड-19 चे एकूण 1,09,462 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोविड –19 रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 48.27% वर पोहोचले आहे. आजमितीस कोरोना बाधित 1,10,960 रुग्ण असून ते सक्रिय वैद्यकीय परीक्षणाखाली आहेत.

सरकारी प्रयोशाळांची संख्या 507 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 217 पर्यंत वाढविण्यात आली आहे (एकूण 727 प्रयोगशाळा). गेल्या 24 तासांत 1,43,661 नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची एकूण संख्या  43,86,379 आहे.

जून 2020 पर्यंत, 1,66,460 अलगीकरण खाटा, 21,473 अतिदक्षता खाटा आणि 72,497 ऑक्सिजन समर्थित खाटा असलेल्या 957 कोविड समर्पित रुग्णालये उपलब्ध झाल्यामुळे कोविडशी संबंधित आरोग्य सुविधा मजबूत झाली आहे. 1,32,593 अलगीकरण खाटा, 10,903 अतिदक्षता खाटा आणि 45,562 ऑक्सिजन समर्थित खाटा असलेली कोविड समर्पित 2,362 आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. देशात कोविड चा प्रसार रोखण्यासाठी 11,210 विलगीकरण केंद्रे आणि 7,529 कोविड सेवा केंद्रे असून तिथे 7,03,786 खाटा उपलब्ध आहेत. आतापर्यंत केंद्राने राज्ये / केंद्रशासित प्रदेश / केंद्रीय संस्थांना 128.48 लाख एन 95 मास्क आणि 104.74 लाख वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) उपलब्ध करुन दिली आहेत.

दिल्लीमध्ये रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने निदान चाचण्या आणि त्याच्या बरोबरीने आक्रमक  देखरेख आणि रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोधकठोर प्रतिबंध आणि त्या परिघातल्या बाबींचे नियमन करण्याची आवश्यकता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी व्यक्त केली आहे.

वर्गीकृत, प्रतिबंधात्मक आणि सक्रिय दृष्टिकोनातून भारत आपली टाळेबंदी उठवण्याची प्रक्रिया सुलभ करीत असल्याने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविडचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असलेल्या सार्वजनिक आणि निम-सार्वजनिक वातावरणात काम करण्यासाठी एसओपी अर्थात प्रमाणित कार्यप्रणाली अपलोड केली आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सामाजिक आणि आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू करण्याची परवानगी देताना कोविडला सुसंगत आचरण बिंबविण्याबरोबरच या रोगाच्या प्रसाराची साखळी तोडण्याचा उद्देश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *