राज्यात सलग दुसऱ्या दिवशी मृत्यू दरात वाढ,दिवसभरात १७९ रूग्णांचा मृत्यू

मुंबई ,१०जुलै /प्रतिनिधी :- राज्यातील कोरोना रुग्णसंख्या गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने चढ उतार कायम आहे. महाराष्ट्रात 10 हजारांपेक्षा कमी कोरोना रुग्णांचं निदान होत आहे. आज (10 जुलै) दिवसभराची कोरोना रुग्णसंख्या समोर आली आहे. चिंताजनक बाब म्हणजे पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या कमी आहे. 

राज्यातील करोना संसर्गाचा वेग कमी जरी झालेला असला, तरी देखील अद्यापही दररोज करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. राज्यात दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या आज पुन्हा एकादा करोनामुक्त झालेल्यांच्या तुलनेत अधिक आढळून आली आहे. आज दिवसभरात राज्यात ८ हजार २९६ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ६ हजार २६ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, १७९ करोनाबाधित रूग्णांचा आज मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५९,०६,४६६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.०५ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे.

राज्यात दिवसभरात  8 हजार 296 कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर दिवसात एकूण 6 हजार 26 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. राज्यामध्ये आतापर्यंत एकूण  59 लाख 6 हजार 466 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

तसेच 9 जुलैच्या तुलनेत आजच्या रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात काहीशी घट झाली आहे. आज राज्याचा रिकव्हरी रेट हा एकूण   96.05% इतका झाला आहे. तर हाच रेट 9 जुलैला 96.08% इतका होता.

मृत्यू दरात वाढ

कोरोनामुळे आज 179 पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चितांजनक बाब म्हणजे मृत्यू दरात गेल्या 2 दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. राज्याचा मृत्यू दर 9 जुलैला 2.03 % इतका होता. जो आज 0.1 ने वाढून 2.04 % इतका झाला आहे. दररोज वाढणाऱ्या मृत्यू दरामुळे चिंतेत वाढ झाली आहे. या वाढत्या दरावर नियंत्रण आणण्याचं आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर असणार आहे.

राज्यातील सक्रीय रुग्ण

राज्यात ताज्या आकडेवारीनुसार आजतायागत एकूण 1 लाख 14 हजार सक्रीय रुग्ण आहेत. म्हणजेच या रुग्णांवर कोरोनाचे उपचार केले जात आहेत. या रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अथक प्रयत्न करत आहेत.