विम्बल्डनची नवी राणी: अॅश्ले बार्टी

विम्बल्डन  :- विम्बल्डन  स्पर्धेच्या महिला एकेरी सामन्यात अग्रमानांकित बार्टीने बाजी मारली. चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिला ६-३,६(४)- ७ (७), ६-३ ने पराभूत करत चषक आपल्या नावावर केला. बार्टीने पहिल्यांदाच विम्बल्डन  स्पर्धा जिंकली आहे. 

Image

यापूर्वी बार्टीने २०१८ मध्ये फ्रेंच खुल्या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. तसेच इव्होनी कावलीनंतर विम्बलडनचं जेतेपद पटकावणारी ऑस्ट्रेलियाची दुसरी महिला टेनिसपटू ठरली आहे. ४१ वर्षानंतर ऑस्ट्रेलियानं महिला एकेरीत विजय प्रस्थापित केला आहे. दोन्ही खेळाडू पहिल्यांदा विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले होते. 

Image

आधी क्रिकेटचं मैदान आणि आता टेनिसच्या कोर्टात दिमाखात आपली धमाकेदार कामगिरी करणाऱ्या या महिला खेळाडूचं जगभरात कौतुक होत आहे.पहिल्या सेटमध्ये दमदार खेळ करणाऱ्या बार्टीला दुसऱ्या सेटमध्ये प्लिस्कोवाने चांगलाच घाम फोडला आणि टायब्रेकरमध्ये विजय मिळवला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये बार्टीने कमबॅक केलं आणि अखेर प्लिस्कोवाला पराभूत केलं.

Image

बार्टीने यंदाच्या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी करत तीन जेतेपदे पटकावली असून माद्रिद खुल्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. मात्र दुखापतीमुळे तिला इटालियन खुल्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतून माघार घ्यावी लागली होती. तसेच फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेतही दुखापतीमुळे तिला दुसऱ्या फेरीचा सामना अर्धवट सोडावा लागला होता.