जालना जिल्ह्यात 19 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह,एकाचा मृत्यु

जालना दि. 21 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 24 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आलाआहे तर जालना तालुक्यातील जालना शहर – 8, मंठा तालुक्यातील उमरखेड -1, अंबड अंबड शहर -1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -1, जाफ्राबाद तालुक्यातील जानेफळ -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -2, जवखेडा -1, राजुर -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा 3, आरटीपीसीआरद्वारे 19 व्यक्तीचा तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 19 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.जिल्ह्यात एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 19668 असुन सध्या रुग्णालयात-69 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6860 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-.809 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-107953 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -19 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-13532 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-93757 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने – 337, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -6540

14 दिवस पाठपुरावादैनिक केलेल्या व्यक्ती- 10, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-6461 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -0, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 0, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -8, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-69,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -0, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-24, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-12992,, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-179 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-197905, मृतांची संख्या-361