औरंगाबाद जिल्ह्यात 42 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,एकाचा मृत्यू

जिल्ह्यात 45520 कोरोनामुक्त, 218 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 21 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 72 जणांना (मनपा 59, ग्रामीण 13) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 45520 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 42 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 46667 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1229 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 218 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (32) बजाजनगर (4),एसआरपीएफ कॅम्प परिसर (1),धूत हॉस्पिटल,परिसर (1),मयुर पार्क (1), दर्गा परिसर (1), नारायण पुष्प हौ. सोसायटी (2), एन-2 सिडको (1), महाराष्ट्र पब्लिक स्कुल परिसर (1), कल्पतरु हौ. सो. (1), बीडबाय पास परिसर (2), एन-9 सिडको (1),घाटी परिसर (1), भारत नगर (1), गुरुगणेश नगर (1), गारखेडा परिसर (1), अन्य (12)

ग्रामीण (10)नागापूर, कन्नड (1), अन्य (9)

एका कोरोनाबाधितांचा मृत्यू

शहरातील एका खासगी रुग्णालयात 60 वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.