मराठा आरक्षण हा राज्य सरकारचाच विषय -केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील 

जालना,६ मे /प्रतिनिधी 

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय हा पूर्ण राज्य सरकारच्या आख्यारित आहे पहील्या दिवसांपासून  केंद्र  सरकार यात कुठेही सहभागी नाही. केंद्र सरकारला महाविकास आघाडीच्या सरकारने काहीच सुचवलेले नाही त्यामुळे केंद्र सरकारचाचा या सगळ्या विषयात हस्तक्षेप करण्याचा काहीही प्रश्न होऊच शकत हा पूर्णपणे राज्य सरकारचा विषय असल्याचे केन्द्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी  जालन्यात सांगितले.

May be an image of 1 person

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह काॅग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते  विनाकारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केन्द्र सरकारला वेठीला धरून मराठा समाजाची आणखी एक दिशाभूल करत असल्याचे दानवे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नाही हे अतिशय कमकुवत सरकार आहे , ठाकरे सरकार आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील त्यांचे सहकारी  राज्यातील  कोणत्याही समस्या असो  केन्द्र सरकारच्या दिशेने बोट दाखवण्याचे राजकारण करतात मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्य न्यायालयात टिकवण्यात अपयशी ठरले आता पुन्हा नेहमीच्या सवयीनुसार  केन्द्राकडे बोट दाखवण्याचे राजकारण सुरू झाले आहे असे ते म्हणाले. फडणवीस  सरकारने सगळ्यांना सोबत घेऊन काम केले होते त्यामुळे इंदिरा सहाणी खटल्याच्या निकालातील याच असाधारण परिस्थितीच्या मुद्द्यावर  उच्च न्यायालयात आम्ही व्यवस्थित बाजू मांडली व जबरदस्त यश मिळाले, दूर्देवाने  सरकार बदलले आणि सर्वोच्य न्यायालयात या सरकारने आपली बाजू व्यवस्थित मांडली नाही त्यामुळे स्थगिती  आणि आता आरक्षण रद्द ठरवले गेले यास सर्वस्वी ठाकरे सरकार जबाबदार आहे असे दानवे म्हणाले. समस्त मराठा समाजाला हे चांगले समजले आहे की काॅग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी समाजाला फसवले आहे त्यामुळे समाज  संतप्त झाला आहे मराठा समाज आरक्षण समन्वय समिती योग्य तो निर्णय घेईल असे दानवे म्हणाले. 
काळा दिवस -बबनराव लोणीकर

May be an image of 1 person and smiling

 मराठा समाजासाठी हा काळा दिवस आहे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात जे मिळाले होते ते काॅग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी घालवले असे माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर म्हणाले. सर्वोच्य न्यायालयात राज्य सरकारने व्यवस्थित वकील दिले नाहीत अनेकदा सुनावणी च्या दरम्यान राज्य शासनाचे वकील अनुपस्थित होते त्यांना योग्य सुचना दिल्या जात नव्हत्या ही वस्तुस्थिती आहे मराठा समाजाचा ठाकरे सरकारने विश्वासघात केला आहे असे लोणीकर म्हणाले.