वुई स्टील हॅव्ह द डीप ब्लॅक नाईट ही कथा आहे संगीत आणि कलेच्या उत्कटतेची आणि संगीताच्या माध्यमातून ओळख शोधण्याची : चित्रपट दिग्दर्शक गुस्तावो गालवाओ

संगीतकार असणे म्हणजे काय आणि जर एखद्याला त्याच्या प्रतिभेसाठी योग्य ओळख मिळाली नाही तर काय वाटते हे मला माहित आहे: मुख्य अभिनेत्री व्हेनेसा गुस्माओ

पणजी, 20 जानेवारी 2021

“वुई स्टील हॅव्ह द डीप ब्लॅक नाईट” या चित्रपटाचे दिग्दर्शक गुस्तावो गालवाओ म्हणतात की, त्यांचा हा चित्रपट संगीत आणि कलेच्या उत्कटतेची आणि संगीताच्या माध्यमातून ओळख शोधण्याची कथा आहे. ते आज 51 व्या भारतीय चित्रपट महोत्सवाच्या पाचव्या दिवशी (20 जानेवारी 2021) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

या चित्रपटाची कथा ही एका तुतारी (ट्रम्पेट) वादकाची आहे जी आपल्या प्रतिभेला योग्य न्याय मिळण्यासाठी धडपड करत आहे. चित्रपटातील पात्रांच्या निवडीविषयी गुस्ताओ म्हणाले की, “मी रॉक बँडमधील संगीताच्या दृष्टीकोनापेक्षा वेगळी पात्र निवडण्याचा प्रयत्न केला आहे. तुतारी शिकायला 10 वर्षे लागतात, म्हणूनच मी इतर कोणतेही वाद्य आणि वादक निवडण्याऐवजी मी चित्रपटाचे मुख्य पात्र म्हणून तुतारी वादकाची निवड केली.” 2019 मध्ये हा चित्रपट पूर्ण झाला आणि लॅटिन अमेरिकन देशांमध्ये चित्रपट निर्मितीसाठी सार्वजनिक निधी हा एकमेव अर्थस्रोत आहे; भारताप्रमाणे तिथे चित्रपटांसाठी खासगी निधीला परवानगी नाही.

रॉक बँडमध्ये तुतारी वादकाची (ट्रम्प्टरची) भूमिका साकारणारी मुख्य अभिनेत्री व्हेनेसा गुस्माओ म्हणाली: “संगीतकार असल्याने माझी बँडचा एक भाग म्हणून निवड झाली; मला माहित आहे की संगीतकार असणे म्हणजे काय आणि जर एखद्याला त्याच्या प्रतिभेसाठी योग्य ओळख मिळाली नाही तर काय वाटते ”


वुई स्टील हॅव्ह द डीप ब्लॅक नाईट विषयी

2019 मध्ये पूर्ण झालेल्या या चित्रपटाची ब्राझिलियन-पोर्तुगीज, इंग्रजी, जर्मन भाषांमध्ये निर्मिती करण्यात आली आहे.