देशातील कोरोनाबाधितांचे व कोरोना बळींचे प्रमाण जगाच्या तुलनेत कमी-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते केशवसृष्टी पुरस्कार प्रदान,कोरोना योद्ध्यांचा राजभवन येथे सन्मान
Image

मुंबई, दि. ८ : कोरोनाकाळात नागरिकांनी सेवाभाव जपला. प्रसंगी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवाही केली. त्यामुळेच देशातील कोरोनाबाधितांचे व कोरोना बळींचे प्रमाण जगाच्या तुलनेत कमी राहिले, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

वैद्यकीय सेवा, पर्यावरण रक्षण, स्वच्छता, पोलीस, प्रशासन यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे ११ वे केशवसृष्टी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, कोरोनाकाळात अनेक व्यक्तींनी तसेच अशासकीय संस्थांनी निःस्वार्थ भावनेने कार्य केले. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांचे प्रमाण नियंत्रणात राहिले. ‘अतिथी देवो भव’ ही आपली परंपरा आहे. स्वच्छतेचे महत्त्व आपणही जाणले आहे. सेवाभाव आपला स्थायीभाव आहे. केशवसृष्टीच्या सर्वसमावेशक कार्याने समाजाचे कल्याण व्हावे, असेही राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

Image

यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र गुप्ता व केशवसृष्टी पुरस्कार समितीच्या अध्यक्षा हेमाताई भाटवडेकर उपस्थित होते.