अल्पवयीन मुलीचे अपहरण ,नराधमाला अटक

औरंगाबाद/प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिला पालनपूर (गुजरात) येथे तिन लाखांना विक्री करणार्‍या नराधमाला सिडको पोलिसांनी मंगळवारी दि.29 रात्री अटक केली. कादरखाँ हैदरखाँ पठाण उर्फ सलिम (40, रा. कासंबरी दर्गा, पडेगांव मुळ रा. धावडा ता. भोकरदन जि. जालना) असे नराधमाचे नाव असून त्याला पाच जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.यू. न्याहारकर यांनी बुधवारी दि.30 दिले.
प्रकरणात 17 वर्षीय पीडितेच्या वडीलांनी फिर्याद दिली. त्यानूसार, फिर्यादीला दोन मुली व एक मुलगा आहे. त्यातील 17 पीडिता ही मोठी आहे. 16 ऑक्टोबर रोजी सकाळी फिर्यादी हे पिसादेवी येथे फर्निचरचे काम करण्यासाठी गेले व रात्री दहा वाजता घरी आले. तेंव्हा पीडिता सायंकाळी पाच वाजेपासून बाहेर गेली ती अद‍्याप आली नसल्याने फिर्यादीच्या मुलांनी त्यांना सांगितले. त्यांनी परिसरात व नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही.

पीडिता यापूर्वीही दोनदा पळाली
पीडिता यापूर्वीही घरातून दोन वेळा पळून गेली होती. त्यासंबंधी पोलिसात तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांनी तीचा शोध घेवून तिला फिर्यादीच्या ताब्यात दिले हाते. त्यामुळे फिर्यादीने पीडिता परत घेईल या आशेने पोलिसात तक्रार दिली नाही. मात्र पीडिता अद‍्यापर्यंत घरी आली नव्हती.
——
पीडितेचे अपहरण करुन तिन लाखात केली विक्री
26 डिसेंबर रोजी सायंकाळी पीडितेने फिर्यादीला फोन केला. व रडत-रडत मला ज्या ठीकाणी आले आहे, ती जागा मला माहित नाही. इथल्या लोकांची भाषा मला कळत नाही. मला यास्मीन नावाच्या एक महिलेने व सलीम नावाच्या व्यक्‍तीने मिसारवाडी येथून मणीनगर (अहमदाबाद) येथे आणले. व एका व्यक्‍तीस तीन लाख रुपयांना माझी विक्री, त्यानंतर महिला व व्यक्‍ती पैसे घेवून  परत औरंबादला आल्याचे सांगितले व तिने फोन कट केला. त्यामुळे फिर्यादीने त्या मोबाइल पुन्हा फोन लावला असता, एका महिलने फोन उचला तुटक हिंदी भाषेत तिने सांगितले की, एक माणुस दुचाकीवर आला व मुलीला घेवुन गेला, तो माणुस परिसरात नविन असून मी त्याला ओळखत नाही. ति व्यक्‍ती पुन्हा दिसल्यास तुम्हाला फोन करुन सांगेन असे सांगितले. प्रकरणात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अशी केली अटक
गुन्ह्यात तपास सुरु असतांना गुप्‍त माहितीदारा मार्फत पोलिसांना आरोपीची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पळशी गाठली. मात्र आरोपीला पोलिसांचा सुगावा लागताच आरोपीने छोटा हत्‍ती घेवुन तेथून धूम ठोकली. पोलिसांनी तब्बल 10 ते 15 किलोमीटर आरोपीचा पीछा करुन त्याला पकडले.

पीडितेच्या सुटकेसाठी पोलीस रवाना
अटक आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर त्याने पीडितेला गुजरातजला विक्री केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानूसार सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड आणि त्यांचे पथक पीडितेच्या सुटकेसाठी गुजरातकडे रवाना झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

पाच जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
आरोपीला आज न्यायालयात हजरकरण्यात आले असता गुजरात येथून पीडितेची सुटका करणे आहे. आरोपी महिला यास्मिन हा पसार असुन त्याला अटक करणे आहे. गुन्ह्यातील आरोपींचे मोठे रॅकेट असण्याची शक्याता असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील सैयद शहनाज यांनी न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीला पाच जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.