सीबीएसई बोर्डाच्या 2021 मधील परीक्षांच्या तारखा ३१ डिसेंबरला  जाहीर होणार

नवी दिल्‍ली, 30 डिसेंबर 2020

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ सीबीएसई बोर्डाच्या 2021 मधील परीक्षांच्या तारखा उद्या जाहीर करणार आहेत. उद्या म्हणजे-  दि. 31 डिसेंबर, 2020 रोजी सायंकाळी 6.00 वाजता पुढच्या वर्षीच्या- 2021 च्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात येतील, अशी माहिती शिक्षण मंत्र्यांनी व्टिटरच्या माध्यमातून दिली आहे.

यासंदर्भात शिक्षण मंत्री पोखरियाल यांनी शिक्षकांबरोबर आभासी संवाद साधताना सांगितले की, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी केलेल्या सूचना सीबीएसई विचारात घेणार असून 2021च्या बोर्ड परीक्षांचे आयोजन करताना त्यानुसार आवश्यक तयारी करण्यात येणार आहे.