नांदेड जिल्ह्यात 58 कोरोना बाधितांची भर तर तिघांचा मृत्यू

नांदेड दि. 12 :- शनिवार 12 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 58 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 37 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 21 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 52 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या 900 अहवालापैकी 831 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 829 एवढी झाली असून यातील 19 हजार 751 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 324 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 18 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. गुरुवार 10 डिसेंबर रोजी किनवट तालुक्यातील बोधडी येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे तर शनिवार 12 डिसेंबर रोजी माहूर तालुक्यातील वाईबाजार येथील 40 वर्षाच्या पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर यशवंतनगर नांदेड येथील 83 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 559 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 10, किनवट कोविड रुग्णालय 4, भोकर कोविड रुग्णालय 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 7, मुखेड कोविड रुग्णालय 14, खाजगी रुग्णालय 5 असे एकूण 52 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.82 टक्के आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 63 हजार 29एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 38 हजार 205एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 829एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 751एकुण मृत्यू संख्या-559उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.82 टक्केआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-5आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-434रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-324आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-18.