भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

Bharat Bandh Today: Commuters Must Avoid These Roads in Haryana And  Delhi-NCR

दिल्ली,मुंबई /औरंगाबाद ,दि.८ डिसेंबर :तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी मंगळवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पंजाब, हरियाणा, दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांत जनजीवन विस्कळीत झाले. अन्य राज्यांतही शेतकरी संघटनांनी निदर्शने करीत शक्तिप्रदर्शन केले. तुरळक अपवाद वगळता ‘भारत बंद’ शांततेत पाळण्यात आला.

उत्तरेकडील राज्यांत, विशेषत: पंजाब, दिल्ली, हरियाणामध्ये सकाळपासूनच बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. गेल्या १३ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी ‘किसान एकता जिंदाबाद’ अशा घोषणा देत देशभरातील शेतकरी एकवटल्याचा संदेश दिला.

Image

भारत बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शेतकरी आंदोलनाच्या (Farmers Protest) समर्थनार्थ ठाण्यात चक्काजाम आंदोलन   करण्यात आले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत रस्त्यावर झोपून आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. नागपुरात प्रसिद्ध संत्रा मार्केटमधील व्यवहार सुरु आहेत. मात्र दररोज २००-३०० गाड्या येतात. त्याठिकाणी आज ५० गाड्या आल्यायत. ग्राहकही १५ ते २० टक्केच दिसून येत आहेत.

मोदी सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. अशात आता मोदी सरकारवर दबाव आणण्यासाठी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या समवेत पाच पक्षांचे नेते उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. डाव्या विचारांचे नेते सीताराम येचुरीही या नेत्यांमध्ये असणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हे पाच नेते उद्या संध्याकाळी पाच वाजता भेटणार आहेत. कोविड प्रोटोकॉल असल्याने पाच नेत्यांनाच भेटण्याची संमती राष्ट्रपतींनी दिली आहे.

सीताराम येचुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपतींसोबत होणारी ही भेट कृषी कायद्यांसंदर्भात असणार आहे. गेल्या १३ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. कृषी कायदे रद्द करण्यासाठी कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. आज शेतकऱ्यांनी भारत बंदचीही हाक दिली होती. या बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डाव्या विचारांचे पक्ष, शिवसेना या सगळ्यांनी पाठिंबा दर्शवला. आता उद्या राष्ट्रपतींची भेट घेऊन कृषी कायद्यांवर तोडगा काढण्यासंबंधीची चर्चा केली जाणार आहे.

रास्ता रोको, निदर्शने

औरंगाबाद:कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या भारत बंदच्या आवाहनाला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.दिल्ली गेट येथे रास्ता रोको करणाऱ्या आंदोलनकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली तर विविध पक्ष, संघटनांनी बंदमध्ये सहभागी होत ठिकठिकाणी केंद्र सरकार विरोधात निदर्शने केली. या बंदमध्ये विरोधीपक्षही सहभागी झाले होते. त्यामुळे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बाजारापेठांत दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. तर जाधववाडी बाजार समितीमधील धान्य मार्केटमधील व्यवहार बंदमुळे थांबले होते. तर व्यापारी महासंघाने शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला असला तरी बंदमध्ये सहभागी होण्याबाबत व्यक्तिगत निर्णय असेल असे जाहीर केले होते. परिणामी, अपवाद वगळता बहुतेक बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत सुरु होते.  

अखिल भारतीय किसान संघर्ष समिती, केंद्रीय कामगार संघटना कृती समिती , जनआंदोलन संघर्ष समितीच्या दिल्ली गेट येथे रास्ता रोको आंदोलन केले. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड केली. कायदेशीर कारवाई नंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनेही बंदला पाठिंबा देत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. मुंकुदवाडी, करमाडसह विविध ठिकाणी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन व्यापाऱ्यांना केले. त्यास मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावाही आघाडीच्या नेत्यांनी केला.

दरम्यान, बंदचा मोठा परिणाम जाधववाडी येथील भाजीपाला मार्केटमध्ये दिसून आला. सरासरी पेक्षा केवळ १० ते १५ टक्के आ‌वक मार्केटमध्ये झाली तर धान्य मार्केटमधील व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवते शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला. मार्केट बंद असल्याने लाखोंचे व्यवहार ठप्प झाले. तर मराठवाडा लेबर युनियनतर्फे बाजार समितीत निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टींसाईड्स सीड्स डिलर्स असोसिएशनने (माफदा) याबंदा प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील सर्व खते, बियाणे विक्री केंद्र बंद होते, असा दावा संघटनेतर्फे करण्यात आला.