वेल डन बेबी:औरंगाबादची मुलगी ,कोण आहे? हे वाचा 

वेल डन बेबी” हा  मराठी चित्रपट वर्ल्ड डीजीटल प्रिमीयर अमेझॉन  प्राइम व्हिडीओवर  ९ एप्रिलला, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर 

प्रदर्शित  होणार आहे.

 या चित्रपटाच्या कथा- पटकथा संवाद लेखिका मर्मबंधा गव्हाणे आहेत.या चित्रपटात पुष्कर जोग, अमृता खानविलकर, वंदना गुप्ते,संजय जाधव यांच्या  प्रमुख भूमिका आहेत.तर प्रियंका तनवर या दिग्दर्शक आहेत. आनंद पंडित,पुष्कर जोग,मोहन नदार हे निर्माते आहेत. 

गीतकार वलय मूलगुंद ,मनोज यादव असून पार्श्वसंगीत सलील अमृते यांनी दिले आहे. प्रामुख्याने लंडन शहरात चित्रीकरण झालेल्या या चित्रपटाची कथा ही आजच्या तरुण जोडप्यांच्या आयुष्याशी संबंधित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आतापर्यंत ३८ लाख लोकांनी पाहिला 

असून ,त्यावरून हा चित्रपट नक्कीच लोकप्रिय ठरेल हे नक्कीच.

 मर्मबंधा गव्हाणे गेल्या १२ वर्षांपासून मुंबईत कार्यरत आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांनी गोरेगाव-मुंबईला स्थापन केलेल्या अत्याधुनिक फ़िल्म इन्स्टिट्यूट “व्हीस्लींग वुड्स इंटरनँशनल “ च्या पहिल्या बँचची ती २००६-८ ची विद्यार्थिनी 

आहे .त्यावेळी शिकवायला अभिनेते नसीरूद्दीन शाह , प्रख्यात पटकथा लेखक अंजुम रजा बली असे मान्यवर होते . मर्मबंधाने दोन 

वर्षांचा अँडव्हान्स डिप्लोमा स्कॉलरशीप घेऊन पूर्ण केला. बॉलीवुडच्या अत्यंतिक स्पर्धेच्या क्षेत्रात हळू हळू संघर्ष करत केवळ गुणवत्तेच्याजोरावर  जम बसवला. ‘नक्षत्र’, ‘सिडनी वुईथ लव्ह’  या हिंदी चित्रपटात तिचा लेखन सहभाग होता. तर फ़ॉक्स इंडियासाठी तिने स्क्रिप्ट डॉक्टरचं काम केलं. डिस्नीसारख्या विश्वविख्यात प्रॉडक्शन हाऊससाठी “अँस्ट्रा फ़ोर्स “ या अमिताभ बच्चनच्या व्यक्तिरेखेवर बेतलेल्या अँनिमेशन मालिकेसाठी लेखन 

करायची संधी तिला मिळाली. तिने मुंबईवर लिहिलेल्या छानशा  नाटकाला स्टंडींग ओव्हेशन मिळालं. “बच्चे है पर कच्चे नहीं “ ही नाटिका पृथ्वी थिअटरसाठी  प्रख्यात नाट्यकर्मी नादिरा बब्बर यांच्या नेतृत्वाखाली लिहिली.

पुष्कर जोग अभिनेता व निर्माता यांच्याकरिता “ ती अँड ती“ चे लेखन केलं व उत्कृष्ट संवादलेखन पुरस्कारासाठी तिला नॉमिनेशन मिळालं. याशिवाय बऱ्याच पटकथा लेखनाची कामं तिनं केली. मुंबई विद्यापीठात नि औरंगाबाद येथील एमजीएममध्ये तिने पटकथा लेखनाच्या 

कार्यशाळा  यशस्वीरित्या घेतल्या. मर्मबंधा ही एमजीएम विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.सुधीर गव्हाणे व प्रा. डॉ.शुभांगी गव्हाणे यांची कन्या होय. सर्व मित्र परिवारातर्फे  मर्मबंधाला हार्दिक शुभेच्छा !                                        

– देवेंद्र भुजबळ.9869484800.