अमेरिकेचे नवे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन, ट्रम्प यांचा केला पराभव

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष (American presidency) कोण होणार याची उत्सुकता गेले काही दिवस होती. अखेर जो बायडेन (Joe Biden) यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा पराभव केला आहे. ते अमेरिकेचे ४६ चे राष्ट्राध्यक्ष ((American presidency) झाले आहेत. अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक (US election 2020 ) निकालाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते. त्यातच आपण ही निवडणूक आपण जिंकलो आहे, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. परंतु ट्विटरने हे ट्विट नाकारले. अधिकृत नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, अमेरिकेतील जवळपास सर्वच मीडियाने बायडेन विजयी झाल्याचे म्हटले आहे.

Image

जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला असून तेच अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत हे आता स्पष्ट झालं आहे. काही वेळापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक जिंकल्याचा दावा अवघं एका ओळीचं ट्विट करुन केला होता. मत्र प्रत्यक्षात जो बायडन यांनी ही निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष हे जो बायडनच होतील यात काही शंका नाही. अमेरिकेतल्या वृत्तसंस्थांनी जो बायडन यांचा विजय झाल्याचं स्पष्ट केलं आहे. CNN ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव स्विकारण्यास नकार दिला आहे. आपण या निवडणुकीविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. बायडेन यांना २८४ तर ट्रम्प यांना २१४ इतकी मते मिळाली. अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बायडेन विक्रमी मतांनी विजयी झालेत. बायडेन यांना सात कोटींहून जास्त मते मिळाली आहेत. बायडेन यांच्या विजयामुळे अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी कमला हॅरीस यांनी निवड होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

दरम्यान हा निकाल समोर येताच जो बायडन यांनी पहिलं ट्विट करुन अमेरिकेच्या नागरिकांचे आभार मानले आहेत. अमेरिकेच्या जनतेने मला राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत पोहचवलं हा मी माझा बहुमान समजतो असंही जो बायडन यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तुम्ही मला मत दिलं असो की नसो मी सगळ्या अमेरिकेच्या नागरिकांसाठी चांगलं काम करणार या आशयाचं वाक्यही बायडन यांच्या ट्विटमध्ये आहे.

जो बायडन आता अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील.  डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केल्याचं आता स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं होतं. जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ही लढत सुरुवातीला अत्यंत चुरशीची झाली. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांना पिछाडीवर टाकत जो बायडन यांनी आघाडी घेतली तेव्हा तेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार हे चित्र जवळपास स्पष्ट झालंच होतं. आता अमेरिकेच्या जनतेनेही त्यावरच शिक्कामोर्तब केलं आहे.

जॉर्जिया आणि पेनसिल्वेनिया या दोन राज्यांमध्येही जो बायडन हेच आघाडीवर असल्याने ते जिंकले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून तेच शपथ घेतील असं वृत्त तेथील प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन शपथ घेतील.