पुलवामा हल्ला:शेजारच्या देशाच्या संसदेत सत्य समोर-पंतप्रधान

  • भारत आपल्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेः पंतप्रधान
  • 130 कोटी भारतीय सशक्त आत्मनिर्भर भारतासाठी काम करत आहेतः पंतप्रधान
  • देशाच्या सुरक्षेसाठी आणि आपल्या सुरक्षा दलाचे मनोबल जपण्यासाठी दहशतवादाला पाठिंबा न देण्याचे राजकीय पक्षांना केले आवाहन
  • दहशतवादाच्या वाढत्या धोक्याविरूद्ध संघटित होण्याचे आंतरराष्ट्रीय समुदायाला केले आवाहन
Banner

नवी दिल्ली, 31 ऑक्‍टोबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील केवडिया येथे “लोह पुरुष” सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एकता दिवस समारंभात आज सहभागी झाले. यावेळी त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पुष्पांजली अर्पण केली, एकता प्रतिज्ञा दिली आणि एकता दिवस संचलनाला उपस्थित राहिले.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की केवडियाच्या एकात्मिक विकासासाठी उद्घाटन केलेल्या विविध प्रकल्पांमुळे या प्रदेशातील पर्यटन वाढण्यास मदत होईल. ते म्हणाले की, पर्यटकांना आता सी-प्लेन सेवेद्वारेही सरदार साहेबांचे दर्शन घेण्यासाठी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देण्याचा पर्याय असेल.

Banner

महर्षि वाल्मीकी यांचे सांस्कृतिक ऐक्य

काही शतकांपूर्वी आदिकवी महर्षि वाल्मीकि यांनी आज आपण जो भारत पाहत आहोत त्यापेक्षा अधिक ऊर्जाशील,  उत्साही आणि सांस्कृतिकदृष्ट्या संघटित भारत बनवण्यासाठी प्रयत्न केले होते असे पंतप्रधानांनी नमूद केले. एकाच दिवशी वाल्मिकी जयंती आणि एकता दिवस हा योग जुळून आल्याबद्दल मोदींनी आनंद व्यक्त केला. सध्याच्या महामारीच्या काळात देशाने आपले सामूहिक सामर्थ्य, सामूहिक इच्छाशक्तीचे अभूतपूर्व दर्शन घडवल्याबद्दल  त्यांनी आनंद व्यक्त केला.

Banner

एकतेचे नवीन आयाम

पंतप्रधान म्हणाले की, काश्मीरच्या विकासात येणाऱ्या अडथळ्यांना मागे टाकून आता काश्मीर विकासाच्या नवीन मार्गावर वाटचाल करत आहे.  ते म्हणाले की, आज देश एकतेचे नवीन आयाम प्रस्थापित करत आहे. ईशान्य भारतात शांतता पुनर्स्थापित  करण्यासाठी आणि त्याच्या विकासासाठी केलेल्या उपाययोजनांचा पंतप्रधानांनी  उल्लेख केला.

ते म्हणाले,  सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम हे सरदार पटेल यांच्या स्वप्नातील भारताचे सांस्कृतिक वैभव पुनर्स्थापित  करण्याचा प्रयत्न आहे.

आत्मनिर्भर भारत

पंतप्रधान म्हणाले की, आज  130 कोटी देशबांधव एकत्र येऊन एक सामर्थ्यवान आणि  सक्षम असा देश निर्माण करत आहेत ज्यात समानता  आणि संधी या दोन्ही गोष्टी असतील.  ते म्हणाले की केवळ एक स्वावलंबी देश आपली प्रगती आणि सुरक्षा याबाबत  विश्वास बाळगू शकतो. म्हणूनच  संरक्षणासह  विविध क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने देश वाटचाल करत आहे असे त्यांनी नमूद केले.

सीमावर्ती क्षेत्राचा विकास आणि भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे संरक्षण

पंतप्रधान म्हणाले की, सीमांकडे पाहण्याचा भारताचा दृष्टीकोन आणि भूमिकां  देखील बदलली आहे.  शेजारच्या देशांवर टीका करताना ते म्हणाले की, आज भारताच्या भूमीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना चोख प्रत्त्युत्तर मिळत आहे. भारत सीमावर्ती भागात  शेकडो किलोमीटरचे  रस्ते, डझनभर पूल आणि अनेक बोगदे बांधत  असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आजचा भारत आपल्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करण्यास पूर्णपणे सज्ज आहे , अशी ग्वाही त्यांनी दिली.

दहशतवादाविरूद्ध एकता

पंतप्रधान म्हणाले की या प्रयत्नांव्यतिरिक्त अनेक आव्हाने आज भारत आणि संपूर्ण जगासमोर आहेत. ते म्हणाले की काही लोक ज्या प्रकारे दहशतवादाच्या समर्थनार्थ बाहेर पडले आहेत तो आज जागतिक चिंतेचा विषय आहे. जगातील सर्व देशांनी, सर्व सरकारांनी, सर्व धर्मांनी दहशतवादाविरोधात एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की शांतता, बंधुत्व आणि एकमेकांप्रति  आदराची भावना  ही मानवतेची खरी ओळख आहे. दहशतवाद-हिंसाचारामुळे कोणाचेही कधीही कल्याण होऊ शकत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की आपली विविधता आपले अस्तित्व आहे आणि आपण खूप असामान्य  आहोत. त्यांनी आठवण करून दिली की भारताची ही एकता ही अशी शक्ती आहे जी इतरांना आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देते.  त्यांना आपली ही विविधता आपला कमकुवतपणा बनवायचा  आहे. अशा शक्तींना ओळखून सावध राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

पुलवामा हल्ला

आज निमलष्करी दलाचे संचलन पाहताना आपल्याला पुलवामा हल्ल्याची आठवण झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की ही घटना देश कधीही विसरू शकत नाही आणि आपल्या शूर सुपुत्रांच्या जाण्याने संपूर्ण देश दु: खी झाला होता.  ते म्हणाले की, या घटनेबाबत जी वक्तव्ये केली गेली ती  देश कधीही विसरणार नाही. ते म्हणाले की, शेजारच्या देशाच्या संसदेत अलिकडेच करण्यात आलेल्या निवेदनांमधून सत्य समोर आले आहे.

त्यांनी देशातील गलिच्छ राजकारणाविषयी खेद व्यक्त केला ज्यातून  स्वार्थीपणा आणि  हेकटपणा दिसला.  पुलवामा हल्ल्यानंतर केलेले राजकारण हे  राजकीय स्वार्थासाठी हे लोक कुठल्या स्तरावर जाऊ शकतात याचे एक उत्तम उदाहरण आहे. अशा राजकीय पक्षांनी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि आपल्या सुरक्षा दलाचे मनोबल उंचावण्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आपल्या स्वार्थासाठी कळत नकळत देशविरोधी शक्तींना मदत करून तुम्ही  देशाच्या किंवा तुमच्या पक्षाच्या हितासाठी काम करू शकणार नाही. आपल्या सर्वांचे सर्वोच्च प्राधान्य  हे देशाच्या हिताला असले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. जेव्हा आपण प्रत्येकाच्या हिताचा विचार करू ,  तेव्हाच आपण प्रगती करू असेही ते म्हणाले.

तत्पूर्वी पंतप्रधानांनी गुजरात पोलीस , केंद्रीय राखीव सशस्त्र दल, सीमा सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलिस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि राष्ट्रीय सुरक्षा दलांचे रंगतदार संचलन पाहिले. या संचलनात सीआरपीएफच्या महिला अधिकाऱ्यांनी केलेल्या रायफल ड्रिलचाही समावेश होता. या प्रसंगी भारतीय हवाई दलाच्या जग्वार विमानांनी फ्लाय-पास्ट सादर केले. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त   भारताच्या आदिवासी वारशाचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमालाही पंतप्रधान उपस्थित होते.