जालना जिल्ह्यात 61 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह,सहा रुग्णाचा मृत्यु

182 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि.29 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 182 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआरद्वारे 60 तर अँटीजेन तपासणीद्वारे 1 असे एकुण 61 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.जिल्ह्यात सहा कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-16567 असुन सध्या रुग्णालयात-159 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5831 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-765 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-67993 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-61 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-10616 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-55859 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने- 1191, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -4906

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-35, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-5326 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-10, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-94 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-12, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-159, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 47, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-182, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-9412, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-925 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-165154 मृतांची संख्या-279