राजकीय बळाचा वापर करून खुलेआम चालतो वेश्‍याव्यवसाय

भाजपचा युवामोर्चा अध्यक्ष भागवत बावणे विरूध्द कारवाई करा- विजय पवार

जालना,२० मार्च /प्रतिनिधी :- काही महिन्याभरापुर्वी राजूर रोडवरील तुका हॉटेलवर खुल्याआम चालत असलेल्या देहविक्री केंद्रावर तत्कालीन पोनि. राजेंद्रसिंह गौर यांनी छापा मारला होता. त्याच धर्तीवर राजूर रोडवर असलेल्या तिरंगा, छमछम, जानकी अशा हॉटेलवर देहविक्रीचा व्यवसाय खुलेआम चालत असल्याचा आरोप करत राजकीय बळाचा वापर करून खुलेआम वेश्‍याव्यवसाय चालविणाऱ्या भाजपचा युवामोर्चा अध्यक्ष भागवत बावणे विरूध्द कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक विजय पवार यांनी केला आहे.

Displaying IMG-20220226-WA0314.jpg
माजी नगरसेवक विजय पवार


या संदर्भात दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात पवार म्हणाले की,  जालना-राजुर रोडवर तिरंगा हॉटेल, देवळगाव राजा रोडवरील छम छम हॉटेल, राजुर रोडवरील जानकी हॉटेल या हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यवसाय  सर्रासपणे पोलिसांच्या डोळ्यात धुळ झोकून सुरू आहे. मात्र राजकीय दबावापोटी पोलिस प्रशासनाने याकडे काना डोळा केला आहे. या देहविक्री व्यवसायामुळे अनेक तरूण या मार्गाकडे वळून भरकटत चालले आहे. तसेच एड्सचे प्रमाण देखील यामुळे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तरी या देहविक्री व्यवसायाला वेळीच आवर घालावी अशी मागणी श्री पवार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केली आहे.