घरगुती गॅस सिलिंडर १०० रुपयांनी स्वस्त:महिला दिनाचे औचित्य साधून पंतप्रधानांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कपात केली घोषित

 नवी दिल्ली,,८ मार्च / प्रतिनिधी :- : जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांना खास भेट दिली आहे. आजपासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. स्वत:नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली.

मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आज महिला दिनानिमित्त आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे केवळ महिला शक्तीचे जीवन सुसह्य होणार नाही, तर करोडो कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल, पाऊल पर्यावरण संरक्षणासाठी देखील उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य देखील सुधारेल”, असेही मोदी म्हणाले.

“आजच्या महिला दिनी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी  कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक भार लक्षणीयरीत्या कमी होईल, विशेषत: आपल्या नारी शक्तीला याचा लाभ होईल. “

स्वयंपाकाचा गॅस आणखी परवडणारा बनवून,  कुटुंबांच्या कल्याणाला हातभार लावण्याचे आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे.  हे महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांचे जीवन सुखकर बनवण्याप्रती आमच्या वचनबद्धतेला अनुसरून आहे.”

मोदींनी महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या, त्यांच्या शक्ती, धैर्य आणि चिकाटीला सलाम केला आणि विविध क्षेत्रात त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. “आमचे सरकार शिक्षण, उद्योजकता, कृषी, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातील उपक्रमांद्वारे महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी वचनबद्ध आहे. गेल्या दशकातील आपल्या कामगिरीवरूनही हे दिसून येते.”