शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथ पूजनाने झाला दिंडीस प्रारंभ

चार हजार मराठी सारस्वतांचा सहभाग, तीन किलो मिटरची दिंडी, फुलांच्या वर्षावात अमळनेरकरांनी केले स्वागत

सानेगुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालय,अमळनेर (जि. जळगाव) ,२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  शंखनाद, टाळमृदंग अन्‌‍‍ ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथांचे पूजन करून 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीस महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे व जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रविंद्र शोभणे, संमेलनाध्यक्ष तथा राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, निमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अमळनेरच्या मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, माजी आमदार स्मिता वाघ यांच्या सह मराठी साहित्य महामंडळ व मराठी वाड्:मय मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्रीसंत सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल संस्थान (वाडी संस्थान) येथून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीच्या पालखीत दासबोध, श्री ज्ञानेश्वरी, भारताचे संविधान, श्रीमद्‍ भगवतगीता, भारतीय संस्कृती या ग्रंथ गुरूंचा समावेश होता.

सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडीस सुरवात होणार असल्याने अमळनेर शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी. प्राध्यापक, शिक्ष्ाक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी याच्यासह सुमारे 4 हजार सारस्वतां च्या गर्दीने अमळनेर शहर फुलले होते. दिंडी जशजशी पुढे पुढे जात होती तस तशी दिडीवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जात होता. यामुळे मराठी सारस्वतांचा उत्साह अधिकच व्दिगुनीत होत होता.

ग्रंथदिंडीच्या मार्गापासून तर दिंडी पान खिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, राणी लक्ष्मीबाई, सुभाष चौक ,स्टेट बँक, पोस्ट ऑफिस, नाट्यगृह, उड्डाणपूल या चौकात विविध रांगोळी काढून ग्रंथांसह सारस्वतांचे स्वागत केले. सकाळी 8 वाजता सुरू झालेली दिंडी संमेलन स्थळी दहा वाजता पोहचली. मंत्री गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष्ा अशोक जैन, केशव स्मृती सेवा संस्था समूहाचे अध्यक्ष्ा डॉ, भरतदादा अमळकर यांनीही या दिंडीत सहभाग घेत एक किलो मीटर अंतर पायी चालले, तर मंत्री महाजन यांनी दंडी मार्गावरील विविध थोर महापुरूषांच्या पुतळ्यांना मार्ल्यापर्ण करून अभिवादन केले.

 फुलांचा वर्षाव

दिंडी जसजशी पुढे पुढे जात होती तस तशी दिडीवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जात होता. यामुळे मराठी सारस्वतांचा उत्साह अधिकच व्दिगुनीत होत होता. शहराच्या विविध कॉलन्यांमधील नागरिकांकडूनही दिंडीवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात येत होता.

संमेलनाध्यक्ष्ाांचा शंखनाद अन्‌‍ मराठी साहित्याचा जमा मेळा

 संमेलनाचे अध्यक्ष्ा प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांनी पुण्याच्या केशव शंखनाद पथकाच्या शंखनादाचे श्रवण केले. एक लयीत वाजणारे शंखध्वनी एैकून प्रा. शोभणे यांनाही शंखनाद करण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनीही शंख घेऊन शंखनाद केला. त्यांचा शंखनाद हा 97 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेची नांदीच ठरली.

सुवासिनींनी केली पालखीची पूजा

शहराच्या विविध कॉलन्यांमधून पालखी वाजतगाजत मार्गस्थ होत असताना सुवासिनी हातात आरती घेवून उभ्या होत्या. पालखी जवळ येताच पालखीतील ग्रंथराजांचे पूजन करून मराठी भाषेचा डंका जगभरात गाजू दे असे आर्जव करत होत्या.

संत आणि स्वांतत्र्यवीरांचाही सहभाग ! 

 या दिंडीत लोकमान्य टिळक, स्वांतत्र्यवीर सावरकर, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, कवयित्री बहिणाबाई चौधरींची वेशभूषा केलेले बालक रथावर विराजमान झाले होते. 

वारकरी पाठशाळेच्या मुले ठरले कौतुकाचा विषय

संत परंंपरेतील वारकऱ्यांबाबत सर्वांना आकर्षण आणि आदर मनात असतो. त्याच परंपरेचे पाईक असलेल्या अमळनेरच्या वारकरी पाठशाळेतील विद्यार्थी दिंडीतील सर्वांच्या कौतुकाचे विषय ठरले. पारंपरिक पांढरे धोतर कुर्ता, डोक्यावर पांढरी टोपी, कपाळाला काळा बुक्का, हातात टाळ अशा वेशभूषेत ते विविध भजने गात रस्त्याने शिस्तीत जात होते.

पारंपरिक वेशभूषेत चिमुकले

 वारकरी पाठशाळेतील मुलांनी टाळ मृदुंगाच्या नाद कीर्तन सादर केले. यासोबत आर्मी स्कूलचे विद्यार्र्थीं त्यांच्या गणवेशात सहभागी झाले होते. तसेच विविध शाळांमधील मुले-मुली देखील सहभागी झाले होते. या मुलांच्या हातात विविध शाळांमधील मुलेमुली देखील सहभागी झाले होते. यावेळी मुलांच्या हातात विविध सुविचार लिहिलेली फलके होती. मुलांनी विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.

पुण्याचे केशव शंखनाद पथक ठरले आकर्षण

पुण्याच्या केशव शंखनाद पथकातील ज्येष्ठ नागरीकांचे शंखनाद पथक या दिंडीचे खास आकर्षण ठरले. या पथकात 51 ज्येष्ठ नागरिक महिला व पुरूषांचा समावेश होता. भगवा जँकेट, पांढरा कुर्ता, डोक्यावर भगवी टोपी असा पेहराव लक्ष्ावेधक होता.

 या संस्थानांचा होता सहभाग

केशव शंखनाद पथक, पुणे, खान्देश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालय,महाविद्यालयाचे  प्राचार्य ए. बी. जैन, उपप्रचार्य, सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, एनएसएस, एनसीसी, वसतीगृह विद्यार्थ्यांसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, ढोल ताशा पथक, गंगराम सखाराम शाळा अमळनेर, द्रो. रा. कन्या शाळा, अमळनेर, प्रताप हायस्कूल, अमळनेर, मंगळग्रह संस्थान ग्रंथ पालखी, स्वामी विवेकानंद शाळा, बंजारा समाज पारंपरिक नृत्य चाळीसगाव, धनगर समाज पारंपारिक नृत्य, वासुदेव पथक जामनेर, नवलभाऊ प्रतिष्ठान आर्मी स्कूल, सावित्रीबाई फुले शाळा अमळनेर, साने गुरूजी शाळा, नगर परिषद सर्व कर्मचारी अमळनेर, मराठी वाड:मंय मंडळाचे सर्व समिती सदस्य, वारकरी पाठशाळा अमळनेर, नंदगाव माध्यमिक विद्यालय, भरवस माध्यमिक विद्यालय, पोलीस प्रशासन, प्रांताअधिकारी, महराष्ट्र मतदान विभाग, फार्मसी महाविद्यालय, एसएनडीटी कॉलेज, एमएसडब्लू कॉलेज, टाकरखेडा माध्यमिक हायस्कूल, उदय माध्यमिक विद्यालय, चौबारी माध्यमिक विद्यालय, रणाईचा माध्यमिक आश्रमशाळा, हातेड माध्यमिक शाळा, कोळपिंप्री माध्यमिक विद्यालय, शारदा माध्यमिक शाळा कळमसरे, पी. एन. मुंदडा माध्यमिक शाळा, इंदिरा गांधी माध्यमिक शाळा, गडखांब माध्यमिक व उच्च माधमिक कॉलेज.

हे चौंक रांगोळ्यांनी सजले

ग्रंथदिंडीच्या मार्गापासून तर दिंडी पान खिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, राणी लक्ष्मीबाई, सुभाष चौक ,स्टेट बॅंक, पोस्ट ऑफिस, नाट्यगृह, उड्डाणपूल या चौकात विविध रांगोळी काढून ग्रंथांसह सारस्वतांचे स्वागत केले.

क्लिक क्लिक आणि सेल्फी

न भुतो न भविष्यती असे हे संमेलन होत असल्याने या दिंडीत सहभागी झालेल्या अनेक बऱ्याच मराठी सारस्वतांनी दिंडी मोक्याची जागा सापडताच मोबाईल काढून क्लिक क्लिक करत अनेक सेल्फी फोटोज काढले. तर काहींनी सोबतच्या सहकाऱ्यांना सांगून फोटो काढून या संमेलनाच्या आठवणी आपल्या स्मृतीत व मोबाईलमध्ये फोटोच्या रूपात जतन करून ठेवल्यात.

 फलकांतून साहित्यिंकाचे स्मरण

दिंडीत सहभागी झालेल्या विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी थोर साहित्यिंकांचे छायाचित्र व त्यांच्या साहित्यातील विचारांचे फलक तयार करून ते दिंडीत दाखवत होते. ग.दि.माडगुळकर, संत ज्ञानेश्वर, मंगेश पाडगावकर,बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे, वि.दा. करंदीकर, साने गुरूजी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्यासारख्या साहित्यिकांच्या विचारांना उजाळा दिला.