एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई,२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- कला संचालनालयामार्फत शालेयस्तरावर आयोजित शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा २०२३ चे निकाल जाहीर झाले आहेत. एलिमेंटरी परीक्षेचा निकाल ९५.५७ टक्के तर इंटरमिजिएट परीक्षेचा ९५.४४ टक्के निकाल जाहीर झाला आहे.

इंटरमिजिएट डॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल ३१ जानेवारी २०२४ रोजी www.doa.maharashtra.gov.in, / https://dge.doamh.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून, लिमेंटरी डॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल ५ फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहे.

या दोन्ही परीक्षांमध्ये २०२३ या वर्षी एकूण आठ लाख १५ हजार १२९ विद्यार्थ्यांची नावे नोंदविलेली होती. एलिमेंटरी परीक्षेस ४ लाख ४६ हजार ७२९ विद्यार्थ्यांनी नोंद केली होती प्रवीष्ट विद्यार्थी ४ लाख २३ हजार ६०७ तर, अनुपस्थित विद्यार्थी २३ हजार १२२ यापैकी एकूण उत्तीर्ण विद्यार्थी ४ लाख ४ हजार ८५७ आहेत.

इंटरमिजिएट परीक्षेस ३ लाख ६८ हजार ४०० विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. त्यापैकी ३ लाख ५९ हजार १९ प्रविष्ठ झाले तर ९ हजार ३८१ अनुपस्थित होते. यापैकी ३ लाख ४२ हजार ६७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती कला संचालनालयाचे परीक्षा नियंत्रक नागेश वाघमोडे यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी २२६२०२३१ / ३२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.