उदयोन्मुख तंत्रज्ञानातील खासगी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी सादर केला दिला एक लाख कोटी रुपयांच्या नवीन निधीचा प्रस्ताव

“आमच्या तंत्रज्ञान जाणकार तरुणांसाठी हा सुवर्णकाळ असेल,” निर्मला सीतारामन

पन्नास वर्षांच्या व्याजमुक्त कर्जासह निधीची तरतूद करणार

संरक्षण क्षेत्रातील डीप-टेक तंत्रज्ञान मजबूत करण्यासाठी आणि ‘आत्मनिर्भरते’ला चालना देण्यासाठी एक नवीन योजना प्रस्तावित

नवीन युगातील तंत्रज्ञान आणि डेटा लोकांचे राहणीमान आणि व्यवसायांचे स्वरूप बदलत आहे: केंद्रीय अर्थमंत्री

नवी दिल्ली ,१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये खासगी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी तयार करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे.

आमच्या तंत्रज्ञान जाणकार तरुणांसाठी हा सुवर्णकाळ असेल असे प्रतिपादन आज संसदेत 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. 

पन्नास वर्षांच्या व्याजमुक्त कर्जासह निधीची तरतूद केली जाईल. ती दीर्घ मुदतीसाठी आणि कमी किंवा शून्य व्याजदरांसह दीर्घकालीन वित्तपुरवठा किंवा पुनर्वित्त प्रदान करेल.

“यामुळे खासगी क्षेत्राला उदयोन्मुख तंत्रज्ञानात संशोधन आणि नवोन्मेष वाढवण्यास प्रोत्साहन मिळेल. आपल्या तरुणाईच्या सामर्थ्य आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणारे कार्यक्रम आपल्याकडे असायला हवेत,” अशी अपेक्षा अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली. 

सीतारामन यांनी संरक्षण उद्देशांसाठी डीप-टेक तंत्रज्ञान बळकट करण्यासाठी आणि ‘आत्मनिर्भरतेला’ चालना देण्यासाठी एक नवीन योजना सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला.

तांत्रिक बदल

नवीन युगातील तंत्रज्ञान आणि डेटा लोकांचे राहणीमान आणि व्यवसायांचे स्वरूप बदलत आहेत याकडे लक्ष वेधून अर्थमंत्री म्हणाल्या की ते नवीन आर्थिक संधी देखील सक्षम करत आहेत आणि तळागाळातील लोकांसह सर्वांसाठी परवडणाऱ्या किमतीत उच्च-गुणवत्तेच्या सेवांची तरतूद सुलभ करत आहेत. 

जागतिक स्तरावर भारतासाठी संधी विस्तारत आहेत हे नमूद करताना सीतारामन यांनी सांगितले कि,”भारत आपल्या लोकांच्या नवकल्पना आणि उद्योजकतेद्वारे उपाय दाखवत आहे.”

संशोधन आणि नवोन्मेष 

संशोधन आणि नवोन्मेष भारताच्या विकासाला चालना देईल, रोजगार निर्मिती करून विकासाकडे नेईल, यावर भर देत सीतारामन म्हणाल्या की, पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी “जय जवान जय किसान”चा नारा दिला होता आणि पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी “जय जवान जय किसान जय विज्ञान” हा नारा दिला होता.

नवोन्मेष हा विकासाचा पाया असल्याने “पंतप्रधान मोदींनी “जय जवान जय किसान जय विज्ञान आणि जय अनुसंधान” असा नारा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरीडॉर हा भारत आणि इतरांसाठीही धोरणात्मक आणि आर्थिकदृष्ट्या परिवर्तन घडवणारा

2014-23 या काळात थेट परकीय गुंतवणूकीचा ओघ 596 अब्ज डॉलर्स

नुकताच जाहीर झालेला  भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरीडॉर हा भारत आणि इतरांसाठीही धोरणात्मक आणि आर्थिकदृष्ट्या परिवर्तन घडवणारा असल्याचे केंद्रीय अर्थ  मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. 2024-25 साठी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, ‘हा कॉरीडॉर, येत्या शेकडो वर्षांसाठी जागतिक व्यापाराचा पाया ठरेल आणि या  कॉरीडॉरचा  भारतीय भूमीवर प्रारंभ झाला होता याचे इतिहासात स्मरण राहील’ या उद्गारांचा पुनरुच्चार केला.

जागतिक परिदृश्य अधोरेखित करत युद्ध आणि संघर्ष यामुळे  भू- राजकीय दृष्ट्या जागतिक घडामोडी अधिक जटील आणि आव्हानात्मक होत चालल्याचे सीतारामन म्हणाल्या. मूळ देशात उद्योगांचे पुनर्स्थापन,मित्र देशात उत्पादन,पुरवठा साखळीत अडथळा आणि खंड, महत्वाची खनिजे आणि तंत्रज्ञानासाठी स्पर्धा यामुळे जागतिकीकरणाची नव्याने व्याख्या होत असल्याचे त्यांनी नमूद  केले. कोविड-19 महामारी नंतर नवी जागतिक रचना निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.  

जगात अतिशय कठीण परिस्थिती असताना भारताने जी-20 अध्यक्षपद भूषवले.उच्च चलनवाढ,चढे व्याज दर,मंदावलेली वाढ,मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कर्ज,अल्प व्यापार वृद्धी,हवामान बदल यासारख्या आव्हानांतून जागतिक अर्थव्यवस्था मार्गक्रमण करत होती  हे  त्यांनी अधोरेखित केले.महामारीने जगासमोर अन्न, खते,इंधन आणि वित्त विषयक संकट उभे केले मात्र भारताने यशस्वीरित्या आपला मार्ग काढल्याचे सीतारामन म्हणाल्या. देशाने पुढील मार्ग दाखवला आणि या जागतिक समस्यांच्या निराकरणासाठी मतैक्य निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.