ग्राहकांमध्ये हक्क आणि अधिकारांविषयी जनजागृती करा- अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे

छत्रपती संभाजीनगर,५ जानेवारी / प्रतिनिधी :- ग्राहकांमध्ये आपले अधिकार व हक्कांबद्दल सजग करण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी केले.

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडली. बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी  वर्षाराणी भोसले, पोलीस उपअधीक्षक प्रकाश चौगुले, उप कार्यकारी अभियंता नयना कोटणीस, बीएसएनएलचे सुनिल मारमत, विज वितरण कंपनीच्या प्रेर्णा बनकर,  सहाय्यक आयुक्त अन्न अ. अ मैत्रे, सहा. आयुक्त औषदे शा. ना. साळे,  उपनियंत्रक वैध मापन शास्त्र आर.डी. दराडे, तसेच  अशासकीय सदस्य विजय चौधरी, अन्वर अलि, अमोल चतूर, राजेश मेहता, नानक वेदी, धनंजय मुळे, शेख अन्वर शेख कैफर, अशोक ठोंबरे आदी उपस्थित होते.

ग्राहकांच्या हक्काचे संवर्धन व संरक्षण करणे, वस्तू उलब्धता , गुणवत्ता, दर, सेवा  याबाबत चर्चा करणे,  जिविताला धोका असणाऱ्या उत्पादनांच्या व सेवांच्या खरेदी विक्री विरुद्ध संरक्षण , दर्जा, क्षमता, शुद्धता मानके याबाबत  जनजागृती करणे याविषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. शासनाच्या विभागांनी करावयाच्या कारवाईबाबत निर्देश देण्यात आले.