राष्ट्रवादी आमदार अपात्रता: सुनावणी गुरुवारपासून

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून बाहेर पडलेल्या अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात अपात्रतेच्या कारवाईसाठी विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी पार पडणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, ३१ जानेवारीपूर्वी यावर निकाल द्यावा लागणार आहे. त्यानुसार, येत्या गुरुवारपासून सुनावणीला सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रताप्रकरणी गुरुवारी सुनावणीला सुरुवात होणार आहे. सुप्रीम कोर्टाने यासंदर्भात विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सूचना दिल्या आहेत. दरम्यान, सध्या राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्ष याबाबत निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे. याचा निकालही कोणत्याही क्षणी येऊ शकतो.