नायलॉन मांजाः निर्मिती, विक्री व वापरावर बंदी

छत्रपती संभाजीनगर,१ जानेवारी / प्रतिनिधी :-मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडविण्यासाठी वापर होणाऱ्या नायलॉन मांजा निर्मिती, विक्री व वापरावर बंदी घालण्यात येत असल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी आज निर्गमित केले आहेत.

नायलॉन मांजा वापरामुळे पशु, पक्षी यांना तसेच पादवारी, वाहनधारक यांना मांजात अडकून होणाऱ्या अपघाताची शक्यता असते. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात खंडपीठात याचिका दाखल असून त्यासंदर्भात निर्देशानुसार हे मनाई आदेश जारी करण्यात  आले आहेत. दि.२ ते १८ हे आदेश लागू राहतील.या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल,असेही स्पष्ट करण्यात आले आहे.