कुर्ला आणि कुत्तामध्ये घोळ अन् राजकीय वर्तुळात खळबळ

नागपूर ,१८ डिसेंबर / प्रतिनिधी :-राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेल्या सलीम कुत्तावरुन चांगलेच घमासान सुरु आहे.भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा फोटो दाखवत त्यांनी सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याचा दावा केला होता. यावरुन काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नितेश राणे वेडे झाले असून ते उल्लेख करत असलेला सलीम कुत्ताचा मृत्यू झाला आहे, असे गोरंट्याल विधानसभा परिसरात म्हणाले होते. तसेच, या प्रकरणी माझी खुशाल चौकशी करा, मी २४ तास इथेच असल्याचेही ते म्हणाले होते. यानंतर सलीम कुत्ता याचा खरंच मृत्यू झालाय का? असा प्रश्न उपस्थित होत होता. आता याबाबत वेगळाच खुलासा झाला आहे. खरंतर गोरंट्याल यांना ‘सलीम कुर्ला’ असे म्हणायचे होते. पण, त्याऐवजी ते ‘सलीम कुत्ता’ म्हणाल्याने हा सर्व गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे.

नितेश राणे यांनी मागील आठवड्यात शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचे आरोप केले होते. यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. सुधाकर बडगुजर यांची नाशिक पोलीस गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे. असं असताना आज कैसाल गौरंट्याल यांनी सलीम कुत्ताची १९९८ साली रुग्णालयात हत्या झाल्याचा दावा केला. यानंतर देखील गोरंट्याल यांनी आक्रमक होत नितेश राणे यांच्यावर टीका केली.

ते म्हणाले, मी जो सलीम कुत्ता सांगतोय त्याचा मृत्यू १९९८ साली झाला. नितेश राणे सांगत आहेत तो चुकीचा सलीम कुत्ता आहे. नितेश राणे वेडा आहे. माझी चौकशी करायची करा, मी २४ तास इथेच आहे, असे ते म्हणाले. पण, माझी बदनामी करणार असाल तर कायदेशीर कारवाई करेल, असा इशाराही गोरंट्याल यांनी दिला.

सलीम कुत्ताची हत्या झाल्याचा गोरंट्याल यांचा दावा

सलीम कुत्ता याची १९९८ साली रुग्णालयात हत्या झाली होती, असा खळबळजनक दावा आमदार कैलास गौरंट्याल यांनी विधानभवन परिसरात केला. ते म्हणाले, माझ्या माहितीनुसार १९९८ साली १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याचा रुग्णालयात मर्डर झाला. छोटा राजन चे हस्तक असलेल्या रोहित वर्मा भानू ढाकरे आणि संतोष शेट्टी यांनी त्याला मारले. आता यामध्ये नवीन सलीम कुत्ता कुठून आणला माहिती नाही. सलीम कुत्ताच्या पत्नीने कोर्टात देखील आपला पती वारल्याचे सांगितले. तसेच सील केलेली प्रॉपर्टी रिलीज करण्याचे देखील सांगितले. टाडा कडून त्याची प्रॉपर्टी सुद्धा रिलीज करण्यात आली आहे. गृहमंत्र्यांना या सगळ्या बाबी माहिती असतात त्यामुळे त्यांनी निवेदन दिले पाहिजे, असे देखील गोरंट्याल म्हणाले.

नितेश राणे वेडे झाले असून ते उल्लेख करत असलेला सलीम कुत्ताचा मृत्यू झाला आहे, असे गोरंट्याल विधानसभा परिसरात म्हणाले होते. तसेच, या प्रकरणी माझी खुशाल चौकशी करा, मी २४ तास इथेच असल्याचेही ते म्हणाले होते.

कुर्ला आणि कुत्तावरुन घोळ

सलीम कुर्ला याची १९९८ साली विरोधी गँगकडून हत्या झालेल्या आरोप गोरंट्याल यांनी केला होता. परंतु आमदार गोरंट्याल यांचा समील कुत्ता आणि सलीम कुर्ला या दोन नावात गोंधळ झाला आणि त्यांनी माध्यामांना चुकीची माहिती दिली. समील कुत्ता हा सद्या येरवडा कारागृहातच आहे. १९९८ साली मारल्या गेलेल्या समील कुर्लावर १९९३ च्या बॉम्बस्फोटात सहभागी असल्याचा आरोप होता. खटला सुरु असताना त्याचा मृत्यू झाला होता.