गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या चप्पल फेकीच्या निषेधार्थ अंबड कडकडीत बंद 

जालना,१० डिसेंबर /प्रतिनिधी :-पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे आमदार गोपीचंद पडळकर हे उपोषणकर्त्यांना भेटण्यास जात असताना त्यांच्यावर चप्पल फेक करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला या घटनेच्या निषेधार्थ  सकल धनगर समाज व ओबीसी समाजाच्या वतीने अंबड शहर  रविवार रोजी कडकडीत बंद ठेवून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी तहसीलदार अंबड यांना निवेदन दिले.यावेळी पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन उपस्थित होते. 

आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत संबंधितावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजाचे तरुण आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेले असून  झालेल्या हल्ल्याचा वेगवेगळ्या माध्यमातून निषेध करीत आहेत.आमदार  पडळकर यांच्यावर हल्ला करून धनगर समाजाला डिवचण्याचा प्रयत्न होत असून हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू वेळ आल्यास जशास तसे उत्तर देऊ.  आमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू आहे सरकारने आम्हाला न्याय न दिल्याने आम्ही आंदोलन करीत आहोत.गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेला हा हल्ला निंदनीय व भ्याड असून ज्यांना हल्ला करायचा आहे त्यांनी समोरून हल्ला करावा  सांगून हल्ला करावा आम्ही त्यांना सामोरे जाण्यास समर्थ आहोत आम्ही पळणारे नसून लढणारे आहोत अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी आंदोलकांनी व्यक्त केल्या.  निवेदनावर बळीराम खटके, बाळासाहेब तायडे,दत्ता लोहकरे,रामशेठ लांडे,रवींद्र खरात,संदीप खरात,शरद राठोड,दिलीप राठोड,सुनील भिडे,बाबासाहेब राठोड अंबादास जळके, दत्ता मुर्तडकर सोमनाथ भालेकर,गणेश भोजने,बळीराम पुंड,विष्णू पुंड,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेकणाऱ्या समाज कंटकावर तत्काळ गुन्हा दाखल करावा नसता आम्ही रस्त्यावर येऊन जश्याच तसे उत्तर देऊ गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे व ओबीसी समाजाचे नेते आहेत पडळकर साहेबावर व ओबीसी समाजाच्या कुठल्याही नेत्यावर कुणी हल्ला करत असेल किवा ओबीसी नेत्याबद्दल अपशब्द बोलत असेल तर ते आम्ही कदापिही खपवून घेणार नाहीत​ अशी प्रतिक्रिया अंबाडमधील ओबीसी नेते बळीराम खटके यांनी दिली. 

-​—————–

पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अंबड शहरातील सर्व समाजातील व्यापारी बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिला त्याबद्दल सर्व व्यापाऱ्यांचे मनापासून आभार.-​सुरेश भावले,प्रदेशाध्यक्ष​,युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य