शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संत्र्यांची व कापसाच्या बोंडांची माळ गळ्यात घालून सरकारविरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांची जोरदार घोषणाबाजी

नागपूर ,७ डिसेंबर  /प्रतिनिधी :-शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव, दुष्काळग्रस्तभागात निधी वाटप आदी शेतकऱ्यांचे प्रश्न व मागण्यांवर आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

कापसाच्या बोंडांची व संत्र्यांची माळ गळ्यात घालून आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानभवन परिसरात आगळेवेगळे आंदोलन करून विधिमंडळ परिसर दणाणून सोडले. 

    शासन दरबारी मोठया प्रमाणात झगमगाट करत कार्यक्रम केला जातो. एकीकडे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था असताना सरकार खोटी भूमिका घेत आहे. राज्यात मोठया प्रमाणात शेतमजूर व शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना हे सरकार संवेदनाहीन झालं असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.