जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सतीश टोपे बिनविरोध

जालना,२ डिसेंबर / प्रतिनिधी :- जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश टोपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आज शनिवारी दुपारी १७ संचालकांच्या उपस्थितीत सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अध्यक्षपदासाठी सतीश टोपे तर उपाध्यक्ष पदासाठी भीमराव जावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

सदर निवडणुकीत निवडणूक निर्णय  अधिकारी म्हणून एस पी काकडे यांनी काम पाहिले त्यांना संजय भोईटे, महेश जयरंगे आणि शरद तनपुरे यांनी सहकार्य केले.