मराठा आरक्षणासाठी आणखी तरुणाने संपवले  जीवन; विष प्राशन करून केली आत्महत्या

नांदेड ,१३ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :-मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात गेल्या अनेक महिण्यापासून आंदोलन सुरु आहे. मनोज जरांगे यांनी अंतरावली सराटी इथं आमरण उपोषण सुरु केलं होत. त्याचबरोबर लोक मोर्चे, रॅली आणि प्रचार देखील करत आहेत. काही जण मराठा आरक्षणासाठी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आत्महत्यांचे चक्र काही केल्या थांबायला तयार नाही आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने नांदेड मधील २५ वर्षीय तरुणाने विष पिऊन आपले जीवन संपवलं आहे. नांदेड पासून जवळच मरळक येथील ही घटना आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचं नावं दाजीबा रामदास शिंदे असं आहे. या तरुणाने ११ नोव्हेंबरला विष प्राशन केलं होत त्यानंतर लगेच त्याला उपचारासाठी त्याला रुग्ण्यालयात दाखल करण्यात आले. पोलिसांना त्याच्याजवळून एक सुसाईड नोट सापडली आहे. आरक्षण मिळत नसल्याने टोकायचं पाऊल उचललं आहे असे दिसून येत आहे. तसाच हा तरुण मराठा आरक्षणासाठी आंदोलनात सहभागी होता आणि एवढेच नव्हे तर तो स्पर्धा परीक्षेची तयार देखील करत होता.

मनोज जरांगे-पाटील हे 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत तिसऱ्या टप्यात राज्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार आहे. एकूण 6 टप्प्यात हा दौरा होणार आहे. विशेष म्हणजे आपल्या या दौऱ्यात प्रत्येक ठिकाणी मनोज जरांगे-पाटील हे आरक्षणासाठी आत्महत्या करू नका असं आवाहन करणार आहेत. जरांगे यांनी याआधी देखील आहत्मत्या करू नका असं आवाहन केलं होत. मराठा समाजाने एकत्र येऊन एकजुटने हा लढा लढू असं मनोज जरांगेचं मत आहे.