नांदेड जिल्ह्यात 236 बाधितांची भर तर सात जणांचा मृत्यू

267 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड दि. 24 :- गुरुवार 24 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 267 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 236 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 76 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 160 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 141 अहवालापैकी 875 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 14 हजार 436 एवढी झाली असून यातील 10 हजार 450 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 537 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 53 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात एकुण 7 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बुधवार 23 सप्टेंबर रोजी कौडगांव ता. लोहा 75 वय वर्षाचा एक पुरुष , एकता नगर नांदेड 70 वय वर्षाचा एक पुरुष, मुक्रमाबाद ता. मुखेड येथील 24 वय वर्षाचा एक पुरुष शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड येथे तर धर्माबाद तालुक्यातील 61 वय वर्षाचा एक पुरुष, बसवेश्वर नगर नांदेड येथील 52 वय वर्षाचा एक पुरुष जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड, मानस नगर नांदेड येथील 70 वय वर्षाची एक महिला खाजगी रुग्णालयात तर गुरुवार 24 सप्टेंबर 2020 रोजी किनवट तालुक्यातील धानोरा येथील 60 वय वर्षाच्या एका महिलेचा किनवट कोविड केअर सेंटर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 378 झाली आहे.

आज बरे झालेल्या 267 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे एकुण 76 तर अँटिजेन तपासणीद्वारे एकुण 160 बाधित आढळले.जिल्ह्यात 3 हजार 537 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहितीएकुण घेतलेले स्वॅब- 75 हजार 878,निगेटिव्ह स्वॅब- 57 हजार 816,आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 236,एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 14 हजार 436,आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2,एकूण मृत्यू संख्या- 378,एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 10 हजार 450,आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 537,आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 494,आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 53,उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 74.17 टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *