मराठा आरक्षणासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यलयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

परभणी ,२७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्या चांगलाचा पेटला आहे. राज्यभरातील मराठा समाजाकडून आरक्षणासाठी उपोषण, मोर्चे, आंदोलन, रॅली काढल्या जात आहे. तर काही ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी शांततेच्या मार्गाने आपलं आंदोलन सुरु ठेवा असं सांगितलं आहे. असं असताना कोणीती टोकाचं पाऊल उचलू नका, आत्महत्या करु नका, तुम्ही आत्महत्या केल्या तर आरक्षणाचा लाभ कोण घेणार अशी साद तरुणांना घातली आहे. असं असताना काही तरुणांकडून टोकाचं पाऊल उचललं जात आहे.

मराठा आरक्षणासाठी मराठा समाज चांगचाल आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांची गाडी देखील एका संतप्त तरुणाने फोडली आहे. काही तरुण मात्र टोकाचं पाऊल उचलताना दिसत आहेत. काल मराठवाड्यात तीन तरुणांनी आपलं जीव संपवली आहे. या तरुणांनी गळफास लावून जगचा निरोप घेतला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाचा विषण आणखीच चिघळताना दिसत आहे. असं असलं तरी राज्यकर्त्यांकडून मात्र कोणतही ठोस पाऊल उचललं जात नाही.

आता मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयात एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या करण्याया प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी वेळीच सतर्कता बाळगत या तरुणाला पकडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा गांभिर्याने घेण्याचं आवाहन मराठा समाजातर्फे करण्यात येत आहे.