परभणी जिल्ह्यात 437 रुग्णांवर उपचार सुरू, 38 रुग्णांची वाढ

परभणी, दि. 14 :- जिल्ह्यातील 38 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6हजार 132 एवढी झाली आहे. त्यापैकी 5 हजार 442 बरे झाले तर 253 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 437 जणांवर उपचार सुरु आहेत. मंगळवार दि.13 ऑक्टोबर 2020 रोजी एकुण 91 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात एकुण 1 हजार 704 बेड उपलब्ध आहेत यापैकी ॲक्टीव्ह बेड 437 असून रिक्त बेडची संख्या 1 हजार 267 अशी आहे. असेजिल्हा प्रशासनाने कळविले आहे.