दिव्य रामकथा सोहळा स्तंभ पूजन  

छत्रपती संभाजीनगर ,२४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी महाराज (बागेश्वर धाम सरकार) यांचा दिव्य रामकथा सोहळा व दरबार सकल हिंदू जनजागरण समितीच्या वतीने .​६,​७ व ​८ नोव्हेंबर रोजी ​अयोध्या नगरी येथील मै​दाना वर होत असून,  या भव्य दिव्या अशा असलेल्या  या कार्यक्रमाचे स्तंभपूजन वेदो मंत्र चार पठण करून प्रमुख साधू संतांच्या हस्ते  उपस्थित  करण्यात  आले.

संयोजक डॉक्टर भागवत कराड केंद्रीय अर्थराज्यमंत्री,  ​गृहनिर्माण मंत्री​ अतुल सावे, अनिल भालेराव यांच्या उपस्थितीमध्ये स्तंभ  पूजन यांच्या हस्ते करण्यात आले.हा मुख्य कार्यक्रम अयोध्या नगरी मैदान, आर.टी.ओ. कार्यालयासमोर, रेल्वे स्थानक रोड, छत्रपती संभाजी येथे होत असून किमान पाच लाख नागरिकांना बसण्याची व्यवस्था होईल अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मंडप उभारणीचे काम सुरू असून आज या ठिकाणी स्तंभ पूजन करण्यात आले,यावेळी अनेक साधुसंतांची उपस्थिती होती.