जालना जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मविआ नेत्यांची मागणी

जालना ,१९ सप्टेंबर /प्रतिनिधी :-अर्ध्याच्यावर पावसाळा संपत आलेला असतानाही अत्यल्प पाऊस पडल्याने जालना जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी जालना जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांनी जिल्हाधकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन माजी मंत्री आ.राजेश टोपे, आ.कैलास गोरंट्याल, माजी आ.सुरेशकुमार जेथलिया, चंद्रकांत दानवे, संतोष सांबरे,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (ऊबाठा) भास्कर अंबेकर, बबलु चौधरी, सतीश टोपे, ए.जे. बोराडे यांनी निवेदन सादर केले.

जालना जिल्हयात गेल्या वर्षी झालेली अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या काही शेतक- यांना अनुदान मिळाले परंतु काहींना अद्याप मिळालेले नाही.

​जालना जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेल्या मागण्या :

• जालना जिल्हयात गेल्या वर्षी काही शेतक-यांना पिकविमा मिळाला परंतु काही शेतक-यांना मिळालेला नाही. शेतक-यांना विमा मिळणेबाबत संबंधीत विमा कंपनीच्या अधिकारी यांना शासनाने सांगितल्यानुसार पत्रव्यवहार झाला परंतु त्यांना अद्याप पिकविमा मिळालेला नाही…

जालना जिल्हयामधील सर्व मंडळामध्ये या वर्षी ४० दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडला आहे. शेतक- यांचा खरीप हंगाम वाया गेला असून शेतकरी चिंतेत आहे. अनेक शेतक-यांनी पिकविमा भरलेला आहे. पिक विमा कधी मिळणार, अशी शेतकरी वारवार विचारणा करीत आहेत. तसेच शेतकऱ्यांना अग्रीम पिकविमा मंजुर करण्यात यावा.

● शासनाने नुकसान भरपाई अनुदान तातडीने जाहीर करावे.

​मनरेगा  अंतर्गत कामे सुरु करुन मजूरांच्या हाताला काम देण्यात दुष्काळ पडलेला. ‘असून शेतक-यांचे पिककर्ज माफ करण्यात यावे..

यावे..

• शेतकऱ्यांना शासनाने मंजूर केलेले अनुदान बँका कर्जखात्यात जमा करीत असल्याने सदरील अनुदान शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे शासनाने याकडे तात्काळ लक्ष देवून अनुदान कर्जखात्यात जमा न करणेबाबत सर्व बँकाना आदेशीत करावे.

• शेतक-यांचे पशुधन जगण्यासाठी चारा छावण्या सुरु कराव्यात.

• जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विज वसुली तात्काळ थांबवून विज खंडीत करण्यात येऊ नये. जिल्हयातील अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा सुरु असून येणा-या काळात तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागणार आहे याबाबत शासनाने दक्षता घ्यावी.

• जिल्ह्यात दुष्काळ पडलेला असल्याने विद्याथ्यांना शैक्षणिक फिस माफ करावी…. • मोसंबी फळांची गळ झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाल्याने तात्काळ पंचनामे करुन नुकसान झाल्याने तात्काळ पंचनामे करून नुकसान अनुदान मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा….