जालना जिल्ह्यात 69 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

179 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना दि.25 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 179 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआरद्वारे 67 तर अँटीजेन तपासणीद्वारे 2 असे एकुण 69 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-16373 असुन सध्या रुग्णालयात-179 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-5739 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-418 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-65829 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-327, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-69 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-10365 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-54441, रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-300, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-4836

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-18, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-5262 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -28, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-133 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-27, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-179, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-16, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-179, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-8778, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1318 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-162542 मृतांची संख्या-269.