विदर्भात बांबूला संजीवनी देण्यासाठी अभ्यासक्रम हवा

जागतिक बांबू दिवसानिमित्त ‘तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बांबूचा शोध’ मध्ये मान्यवरांचे मत

नागपूर,१८ सप्टेंबर /प्रतिनिधी :- विदर्भात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. मात्र, सिमेंट काँक्रीटचे जंगल वाढत आहे. जंगल वाचवून पर्यावरण वाचविण्यासाठी बांबूला योग्य स्थान देण्याची गरज आहे. बांबू साहित्य तयार होत आहेत. पण मार्केट दिले नाही तर इंडस्ट्री उभी राहणार नाही. बांबूला संजीवनी द्यायची असेल तर एज्युकेशन, आर्किटेक्चर, टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये बांबू अभ्यासक्रम हवा, असे मत वक्त्यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र बांबू विकास मंडळ आणि बांबू सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र चॅप्टच्या बांबू विकास आणि संवर्धन समिती विदर्भ प्रदेशच्या वतीने सोमवार, 18 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी मिमोन्सा, चिटनविस सेंटर, सिव्हिल लाईन्स, नागपूर च्या वतीने  जागतिक बांबू दिवसानिमित्त  ” तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बांबूचा शोध” (Exploring Bamboo Through Technology Interventions”) या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर, कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर (COA) इंडिया, नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रा.अभय पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र बांबू विकास मंडळचे व्यवस्थापकीय संचालक एम. श्रीनिवास राव, बांबू विकास व संवर्धन समितीचे निमंत्रक आर्किटेक सुनील जोशी यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बांबू विकास व संवर्धन समिती – विदर्भ प्रदेशचे अध्यक्ष अजय पाटील यांनी केले. त्यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून आम्ही बांबू या विषयावर काम करत आहोत. या संस्थेच्या प्रगतीच्या उपक्रमांबद्दल त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना मुख्य वक्ता प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर म्हणाले की, बांबू हा एक उपयुक्त वनस्पती आहे. त्याचा उपयोग बांधकाम, फर्निचर, वाहतूक, ऊर्जा इत्यादी अनेक क्षेत्रात होतो. विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात बांबूच्या उत्पादनाची मोठी क्षमता आहे. बांबूला संजीवनी देण्यासाठी बांबूच्या लागवडीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. बांबूच्या निर्मितीसाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करणे आवश्यक आहे.

यावेळी त्यांनी राज्य व केंद्र शासनाने जाहीर केलेलया बांबू विकासाच्या योजनांची माहिती दिली. बांबू विकासाकरता अटल बांबू समृद्धी योजना, नॅशनल बांबू मिशनची स्थापना झाली आणि त्याच्या अंतर्गत बांबू विकासाकरता मोठ्या प्रमाणावर रोपण, उत्तम प्रजातीचे बांबू निर्मिती होऊ लागली आहे. शासकीय जमिनीवर बांबूची लागवड करणे आणि बांबूपासून जी काही उत्पादन होतात, त्या इंडस्ट्रीजला मदत करणे आणि तिची उत्पादन जी होतात त्याचं मार्केटिंग करणे अशा प्रकारची कार्य ही नॅशनल बांबू मिशनने केले, असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी त्यांनी बांबू विषयावर काम करणाऱ्यासाठी पहिले वर्कशॉप चंद्रपूर वन अकॅडमीमध्ये घेण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चीचपल्ली येथील बांबू संशोधन केंद्राला लागलेल्या आगीच्या घटनेतून बोध घेऊन बांबूच्या इमारतींना फायरफ्रुफ करण्यासाठी उपाययोजना आखण्यात येत असल्याचे सांगितले. बांबूला पुढे प्रगतिशील करण्यामध्ये किंवा त्याची भरभराट करण्यामध्ये जे नेतृत्व पुढे येईल त्याना नक्कीच सहाय्य करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर (COA) इंडिया, नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रा.अभय पुरोहित म्हणाले की, बांबू हा एक शाश्वत स्त्रोत आहे. बांबूच्या साहित्याचा वापर करून आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो. बांबूचा वापर करून आपण डिझाइनमध्ये नवकल्पना करू शकतो.

महाराष्ट्र बांबू विकास मंडळचे व्यवस्थापकीय संचालक एम. श्रीनिवास राव म्हणाले की, बांबूच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे. बांबूच्या लागवडीसाठी अनुदान देण्यात येत आहे. बांबूच्या निर्मितीसाठी तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे.

बांबू विकास व संवर्धन समितीचे निमंत्रक आर्किटेक सुनील जोशी म्हणाले की, बांबूचा वापर करून आपण शाश्वत इमारती बांधू शकतो. बांबूचा वापर करून आपण वाहतूक आणि ऊर्जा क्षेत्रातही नवकल्पना करू शकतो. बांबूच्या निर्मितीसाठी तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे. बांबूच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या चर्चासत्रात बांबूच्या लागवडी, उत्पादन आणि वापराबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बांबूला संजीवनी देण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देण्यात आला.

विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी (VNIT), नागपूरचे डॉ. दिलीप पेशवे यांनी सांगितले, VNITच्या माध्यमातून शास्त्री – मिस्त्री वर्कशॉप नावाचा एक कॉन्सेप्ट राबवत येत आहे. शास्त्री म्हणजे जो माणूस या विषयावर अभ्यास करतो आहे आणि काहीतरी माहिती कमावतो आणि मिस्त्री म्हणजे तो जो हाताने त्या बांबू वर काम करतो तो. या दोघांना स्किल ओरिएंटेशनच्या अंतर्गत डिग्री म्हणून सर्टिफिकेट देण्याचा ऍडव्हान्स बांबू अभ्याकक्रम सुरु होत असल्याची माहिती दिली.

या कार्यक्रमाला माजी नगरसेविका प्रगती पाटील, राजेंद्र जगताप, उदय गडकरी, आशिष नागपूरकर, राजू देशपांडे, डॉ. पिनाक दंदे, संजय ठाकरे, ममता जयस्वाल, सना पंडित, स्वप्ना नायर, प्रियंका खंडेलवाल, शुभंकर पाटील, रमेश ठाकरे, संजय पुगलिया, राहुल देशमुख, प्रताप गोस्वामी आदी उपस्थित होते उपस्थितांचे आभार महेश मोका यांनी मानले.