मराठवाड्यात झालेली अतिवृष्टी व परतीचा पावसाने झालेले नुकसान याकडे सध्याच्या सरकारचे दुर्लक्ष-माजी मंत्री राजेश टोपे

नागपूर ,२८ डिसेंबर/ प्रतिनिधी :-मराठवाड्यात झालेली अतिवृष्टी व परतीचा पावसाने झालेले नुकसान याकडे सध्याच्या सरकारचे दुर्लक्ष आहे, असे २९३ प्रस्तावावरील चर्चेत माजी मंत्री राजेश टोपे यांनी नमूद केले.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली नुकसान भरपाई तुटपूंजी आहे. २० लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. पिक विमापाससून २० लाख शेतकरी वंचित आहेत. १ हजार ७४ कोटी पिक विमाची मागणी असताना केवळ १०० कोटी मिळाले आहेत. केवळ १० टक्के मिळाले आहेत मोठ्या प्रमाणात विमा कंपनी शेतकऱ्यांची लूट करते. या बाबतीत राज्य सरकारने लक्ष दिले पाहिजे. मराठवाड्यात जालनामधील थोडी फार इंडस्ट्री सोडली तर सर्व भागाचे अर्थकारण कृषीवर अवलंबून आहे. त्यामुळे कृषीला लागणारे संसाधन देणे अत्यंत गरजेचे आहे याकडे राजेश टोपे यांनी सभागृहाचे लक्ष वेधत मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले.