सरकारी कर्मचारी मारहाण प्रकरण; काँग्रेस आमदाराला एका वर्षाची शिक्षा

सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार अडचणीत

नागपूर ,१३ जानेवारी  / प्रतिनिधी :- काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. २०१७मध्ये महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यासह कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवत नागपूर सत्र न्यायालयाने एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने ३५३च्या गुन्ह्यामध्ये १ वर्षाची शिक्षा आणि २ हजारच दंड सुनावलं आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील अडचणीत वाढ होणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

२०१७मध्ये नागपूर जिल्हयामधील तेलगावात शेतकऱ्यांच्या शेतातून महापारेषणचे टॉवर टाकण्याचे काम सुरु होते. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत होते. तर, शेतकऱ्यांना त्याची नुकसानभरपाई देखील मिळत नव्हती. म्हणून शेतकऱ्यांनी या संदर्भातील तक्रार आमदार सुनील केदार यांच्या कडे केली. त्यानंतर लगेच सुनील केदार हे घटनास्थळी पोहचले. तेथील उपस्थित अभियंता आणि महापारेषणच्या अधिकाऱ्याला मारहाण करत काम बंद पाडले. याबद्दलची तक्रार केळवद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.