Skip to content
Saturday, September 23, 2023
Latest:
  • अजित पवार गट आक्रमक ! शरद पवार गटातील आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल
  • राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या पाच टक्के शैक्षणिक आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेणार -उपमुख्यमंत्री अजित पवार
  • पुणे फेस्टिव्हलचे पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन
  • शेतकऱ्यांना मिळणार ‘रासायनिक व सेंद्रीय खते’ – मंत्री संदिपान भुमरे
  • नृत्यांगना गुरु पार्वती दत्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या नृत्याने  प्रेक्षक मंत्रमुग्ध
aajdinank logo

आज दिनांक

अपडेट झटपट

  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम
  • दिनांक स्पेशल
  • मनोरंजन
  • देश विदेश
  • व्यापार
  • Contact
मराठवाडा  मुंबई  

मराठवाड्यातील इनाम जमिनीसंदर्भातील अहवाल तत्काळ सादर करावा – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

September 13, 2023September 13, 2023 Aaj Dinank Team Report on Inam land in Marathwada should be submitted immediately – Revenue Minister Radhakrishna Vikhe-Patil, इनाम जमिनी, बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई,१२ सप्टेंबर /प्रतिनिधी :-विभागीय आयुक्तांनी मराठवाडा विभागाचा परिपूर्ण अभ्यास करुन इनाम जमिनीसंदर्भातील वस्तुनिष्ठ अहवाल शासनास तातडीने सादर करावा असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

हैदराबाद रोख इनामे रद्द करणे अधिनियम १९५४ चे कलम २ अ मध्ये सुधारणा करण्यासंदर्भातील बैठक आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार सुरेश धस, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सहसचिव श्रीराम यादव, दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय अपर आयुक्त बी. जे. बेलदार, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. पी. पाठक यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

इनाम जमिनीसंदर्भात अभ्यासपूर्ण अहवाल करीत असताना यामध्ये संबंधित जिल्हाधिकारी यांनी तेथील तज्ज्ञांना समितीमध्ये घ्यावे आणि त्यानंतर समितीचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करावा. बीड जिल्ह्यातील देवस्थान इनाम जमिनीच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीच्या निराकरणाबाबत शासनाने छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांना एक सदस्यीय समिती गठीत करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या समितीने दिलेला अहवाल शासनास प्राप्त झाला आहे. या अहवालाचा सुद्धा अभ्यास विभागामार्फत करण्यात यावा असे श्री. विखे-पाटील म्हणाले.

हैद्राबाद इनामे आणि रोख अनुदाने नष्ट करण्याबाबत अधिनियम १९५४ च्या कलम २ (अ) (३) मध्ये सुधारणा करण्याबाबतच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाला सादर करण्यात आला आहे. या विभागाकडून अभिप्राय आल्यानंतर याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असेही श्री. विखे-पाटील म्हणाले.

  • ← आजी आजोबा हे एकत्रित कुटुंब पद्धतीचा आधार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
  • मराठवाडा विभागात कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी आराखडा तयार करावा – कृषी मंत्री धनंजय मुंडे →

You May Also Like

‘स्टॅण्ड अप अगेन्स्ट व्हायलेंस’ ॲपचे अनावरण

August 14, 2020August 14, 2020 Aaj Dinank Team 0

अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची प्रक्रिया सुरू – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

March 22, 2022March 22, 2022 Aaj Dinank Team

‘ऑपरेशन विजय’ मधील शहिदांचा पराक्रम ऊर्जा आणि प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

September 19, 2023September 19, 2023 Aaj Dinank Team

ताज्या बातम्या

अजित पवार गट आक्रमक ! शरद पवार गटातील आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल
महाराष्ट्र राजकारण 

अजित पवार गट आक्रमक ! शरद पवार गटातील आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल

September 23, 2023September 23, 2023 Aaj Dinank Team

मुंबई,२२ सप्टेंबर /प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या गटातील आमदारांविरोधात अपात्रता याचिका

राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या पाच टक्के शैक्षणिक आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेणार -उपमुख्यमंत्री अजित पवार
महाराष्ट्र मुंबई  

राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या पाच टक्के शैक्षणिक आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेणार -उपमुख्यमंत्री अजित पवार

September 23, 2023September 23, 2023 Aaj Dinank Team
पुणे फेस्टिव्हलचे पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे  सांस्कृतिक  

पुणे फेस्टिव्हलचे पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

September 23, 2023September 23, 2023 Aaj Dinank Team
शेतकऱ्यांना मिळणार ‘रासायनिक व सेंद्रीय खते’ – मंत्री संदिपान भुमरे
शेती -कृषी  

शेतकऱ्यांना मिळणार ‘रासायनिक व सेंद्रीय खते’ – मंत्री संदिपान भुमरे

September 23, 2023September 23, 2023 Aaj Dinank Team
नृत्यांगना गुरु पार्वती दत्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या नृत्याने  प्रेक्षक मंत्रमुग्ध
पुणे  सांस्कृतिक  

नृत्यांगना गुरु पार्वती दत्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या नृत्याने  प्रेक्षक मंत्रमुग्ध

September 23, 2023September 23, 2023 Aaj Dinank Team

About Us

www.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.

कॅलेंडर

September 2023
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  
« Aug    

संपर्क

ईमेल: [email protected]

[email protected]

मोबाईल नंबर -८४८४०३०७८१

पत्ता :
आज दिनांक मीडिया सर्व्हिसेस

शॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१

 

Copyright © 2020.AajDinank Powered by Ashvamedh Software.