राष्ट्रप्रमुखांनी राजघाट इथे महात्मा गांधी यांना अर्पण केली आदरांजली

नवी दिल्ली,​१०सप्टेंबर / प्रतिनिधी:- गांधीजींचे कालातीत आदर्श आमच्या सामुदायिक दृष्टीकोनातून सुसंवादी, समावेशक आणि समृद्ध जागतिक भवितव्यासाठी मार्गदर्शन करतात असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि G20 सदस्य राष्ट्रांच्या नेत्यांनी आज ऐतिहासिक राजघाटावर महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. गांधीजींचे कालातीत आदर्श सुसंवादी, समावेशक आणि समृद्ध जागतिक भवितव्यासाठी सामुदायिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले की:

“शांतता, सेवा, करुणा आणि अहिंसेचे दीपस्तंभ असलेल्या महात्मा गांधी यांना ऐतिहासिक राजघाटावर G20 परिवाराने आदरांजली वाहिली.

राष्ट्रांची वैविध्ये एकत्र येत असताना, गांधीजींचे कालातीत आदर्श आमच्या सामुदायिक दृष्टीकोनातून सुसंवादी, समावेशक आणि समृद्ध जागतिक भवितव्यासाठी  मार्गदर्शन करतात.”