संसदेच्या विशेष अधिवेशनात कायदा  सरकारने करुन समस्त मराठा समाजाला आरक्षण मिळुन द्यावे -विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार

जालना ,३ सप्टेंबर /प्रतिनिधी :- मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी तुमची मागणी मला मान्य असुन मराठा समाजाला पन्नास टक्यात घेतले तर कसे होईल अशी भूमिका माझी पूर्वी होती ही आता नाही आता ओबीसी मधून आरक्षण देताना जेवढा टक्का वाढेल तेवढी मूळ आरक्षणाची  टक्केवारी केंद्र सरकराने वाढुन देण्याची मागणी विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी केली. 

अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी लाठीमार झाला त्याअनुषंगाने येथे  आले होते.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आले असते आरक्षणाचा तिढा सुटला असता पण  तसे केले नाही.केंद्रात सरकार, राज्यात सरकार तरीसुद्धा आरक्षणाचा मुद्दा मतासाठी निर्णय घेत नाही.केंद्रात बहुमत असलेल्या सरकारने आता १३ तारखेला होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात कायदा  सरकारने करुन समस्त मराठा समाजाला आरक्षण मिळुन दयावे असेही विजय वड्डेटीवार म्हणाले.

उपोषणाला बसलेले  मनोज जरांगे यांचे व मराठा समाजाचे रक्त सांडले नाही पाहिजे यासाठी मी इथे आलोमराठवाड्यातील हा समाज कुणबी होता हे मला माहीत आहे
निजामाच्या काळात तुम्ही कुणबी होता पण सरकारच्या काळात कुणबी होईना.मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या, आरक्षणाचा टक्का वाढवून मराठा समाजाला सरकारने न्याय देण्याची  भूमिका  घ्यावी असे आवाहनही  विजय वड्डेटीवार यांनी केले. 
ओबीसी आणि कुणबी भांडण लावण्याचे काम सध्या सुरू आहे. मी राज्यपालांना सांगणार आहे की विशेष अधिवेशन बोलवा. या ठिकाणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आले असते तर मार्ग निघाला असता आता ५२ टक्क्यात आम्हाला  २७ टक्के आरक्षण मिळते तुमचा समावेश या प्रवर्गात झाल्यास आरक्षणाचा टक्का वाढवून द्यावा.मराठा आंदोलकांवरील  गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारने वेळ काढूपणा करू नये , तात्काळ गुन्हे रद्द करा , मराठा समाजावरील हल्ला हे पाप सरकारचे आहे जनता सत्ताधाऱ्यांना जागा दाखविल.तुमचे आणि आमचे रक्त छत्रपतींचे आहे. अधिकाऱ्यांच्या सक्तीच्या सुट्या,बदल्या अश्या कार्यवाही करण्यापेक्षा त्यांना बडतर्फ करण्याची मागणी विरोध पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी सांगितले.