Skip to content
Sunday, September 24, 2023
Latest:
  • अजित पवार गट आक्रमक ! शरद पवार गटातील आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल
  • राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या पाच टक्के शैक्षणिक आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेणार -उपमुख्यमंत्री अजित पवार
  • पुणे फेस्टिव्हलचे पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन
  • शेतकऱ्यांना मिळणार ‘रासायनिक व सेंद्रीय खते’ – मंत्री संदिपान भुमरे
  • नृत्यांगना गुरु पार्वती दत्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या नृत्याने  प्रेक्षक मंत्रमुग्ध
aajdinank logo

आज दिनांक

अपडेट झटपट

  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • क्राईम
  • दिनांक स्पेशल
  • मनोरंजन
  • देश विदेश
  • व्यापार
  • Contact
मराठवाडा  मुंबई  

छत्रपती संभाजीनगर , जालना, हिंगोली, धाराशिव  जिल्ह्यात मुलींचे बालगृह सुरु करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार– बाल हक्क संरक्षण आयोग अध्यक्ष ॲड. सुशीबेन शहा

August 22, 2023August 22, 2023 Aaj Dinank Team Will follow up with the government to start a children's home for girls - Child Rights Protection Commission Chairman Adv. Sushiben Shah

मुंबई : मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर , जालना, हिंगोली व धाराशिव  या चार जिल्ह्यात मुलींचे बालगृह सुरु करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे, असे बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शहा यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत ‘पोक्सो’ व बाल न्याय अधिनियम कायद्यांतर्गत दाखल प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी औरंगाबाद विभागात आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ॲड. शहा यांनी ही माहिती दिली.

बाल लैंगिक गुन्ह्यांच्या घटना घडल्यास तातडीने नोंद घेतली जावी याबाबत पोलीस प्रशासनाला  सूचना केल्या. पोलीस दल आणि बाल कल्याण समिती यांच्याकडून पोक्सो व बाल न्याय अधिनियम संदर्भात  प्राप्त माहितीचे विश्लेषण ‘मजलिस’ संस्थेच्या पदाधिकारी यांनी केले.

यावेळी छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव , हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर या जिल्ह्यातील बाल कल्याण समितीचे सदस्य, जेजेबीचे सदस्य यांनी ‘पोक्सो’ व बाल न्याय अधिनियम कायद्याची अंमलबजावणी करताना येणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केली. तसेच प्रभावी अमंलबजावणीसाठी सूचना केल्या.

बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष ॲड. शहा यांनी ‘पोक्सो’ व बाल न्याय अधिनियम कायदा अंमलबजावणी करताना येणाऱ्या सर्व समस्या तातडीने सोडवल्या जातील. तसेच येत्या काळात सर्वांना प्रशिक्षण देऊन बालकांच्या हक्कांचा लढा अधिक मजबूत केला जाईल, असे सांगितले.

सहाय्यक व्यक्ती, सदस्यांकडून शिफारशी मागवून तीन महिन्यात अहवाल सादर केला जाईल. सखी सावित्री कायद्याची जनजागृती करण्यासंबंधी या बैठकीत चर्चा करण्यात आली.

या बैठकीत बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य, महिला व बाल विकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, विभागीय उपायुक्त हर्षा देशमुख, बाल न्याय मंडळाचे सदस्य, बालगृहांचे अधीक्षक, जिल्हा महिला व बाल संरक्षण विभाग, खासगी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

  • ← ‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने’तून आता खतांसाठीही १०० टक्के अनुदान मिळणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे
  • छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचा गृहनिर्माण मंत्र्यांनी घेतला आढावा →

You May Also Like

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट बोलायला हवे,युती करण्यासाठी शिवसेनाच असावी असं काही आहे का? : नारायण राणे

September 18, 2021September 18, 2021 Aaj Dinank Team

राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१ टक्क्यांवर

August 1, 2020August 1, 2020 Aaj Dinank Team 0

औरंगाबाद जिल्ह्यात 4834 कोरोनामुक्त, 3032 रुग्णांवर उपचार सुरू

July 11, 2020July 11, 2020 Aaj Dinank Team 0

ताज्या बातम्या

अजित पवार गट आक्रमक ! शरद पवार गटातील आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल
महाराष्ट्र राजकारण 

अजित पवार गट आक्रमक ! शरद पवार गटातील आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल

September 23, 2023September 23, 2023 Aaj Dinank Team

मुंबई,२२ सप्टेंबर /प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या गटातील आमदारांविरोधात अपात्रता याचिका

राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या पाच टक्के शैक्षणिक आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेणार -उपमुख्यमंत्री अजित पवार
महाराष्ट्र मुंबई  

राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या पाच टक्के शैक्षणिक आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेणार -उपमुख्यमंत्री अजित पवार

September 23, 2023September 23, 2023 Aaj Dinank Team
पुणे फेस्टिव्हलचे पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे  सांस्कृतिक  

पुणे फेस्टिव्हलचे पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन

September 23, 2023September 23, 2023 Aaj Dinank Team
शेतकऱ्यांना मिळणार ‘रासायनिक व सेंद्रीय खते’ – मंत्री संदिपान भुमरे
शेती -कृषी  

शेतकऱ्यांना मिळणार ‘रासायनिक व सेंद्रीय खते’ – मंत्री संदिपान भुमरे

September 23, 2023September 23, 2023 Aaj Dinank Team
नृत्यांगना गुरु पार्वती दत्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या नृत्याने  प्रेक्षक मंत्रमुग्ध
पुणे  सांस्कृतिक  

नृत्यांगना गुरु पार्वती दत्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या नृत्याने  प्रेक्षक मंत्रमुग्ध

September 23, 2023September 23, 2023 Aaj Dinank Team

About Us

www.aajdinank.com ’ हे मराठवाड्यातील विभागीय पातळीवरचे पहिलंवहिलं ऑनलाइन न्यूज पोर्टल. प्रत्येक घटना ,वास्तव टिपणा-या निःपक्ष बातम्या . काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज आज दिनांकच्या पोर्टलवर . समाजकारण ,राजकारण ,साहित्य ,नाटक ,सिनेमा ,पुस्तक ,लेखक ,नट -नट्या ,गल्ली ते दिल्ली ,अर्थ ,व्यापार ,ट्रेंड ,फॅशन यावर प्रकाश टाकणा-या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज पोर्टल. आज दिनांकमध्ये वेळोवेळी बदल केले जातीलच, वाचकांनीही आपल्या सूचना आवर्जून कळवाव्यात.

कॅलेंडर

September 2023
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  
« Aug    

संपर्क

ईमेल: [email protected]

[email protected]

मोबाईल नंबर -८४८४०३०७८१

पत्ता :
आज दिनांक मीडिया सर्व्हिसेस

शॉप नंबर १४,पहिला मजला ज्योतिर्मय कॉम्प्लेक्स ,जालना रोड ,औरंगाबाद -४३१००१

 

Copyright © 2020.AajDinank Powered by Ashvamedh Software.